Buldhana : शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकांचे नुकसान, शेती कामेही रखडली, काय आहे शिवरातले चित्र?
अधिकच्या पावसामुळे पिके सडण्याच्या मार्गावर आहेत तर काही ठिकाणी पिवळेही पडलेली आहेत. अशा परस्थितीमध्ये पीक फवारणीचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. मात्र, पावसाची संततधार आणि शेत जमिनीत वाफसा नसल्याने शेतकऱ्यांना तणनाशक फवारणी, पाण्याचा निचरा करणे, निंदन, डवरे यासारखी कामे करता येत नाहीत.
बुलढाणा : पावसाअभावी जूनमध्ये जी परस्थिती शेतकऱ्यांवर ओढावली होती तीच आता जुलैमध्ये पाऊस होऊन देखील कायम आहे. जुलैच्या 1 तारखेपासून सुरु झालेल्या पावसामुळे वाटलं होत शेत शिवरातले चित्र बदलेन पण निसर्गाच्या लहरीपणामुळे (Farmer Trouble) शेतकऱ्यांवरील संकट कायम आहे. दरम्यानच्या काळात (Kharif Season) खरिपातील रखडलेल्या पेरण्या मार्गी लागल्या आहेत पण जे पेरलं ते उगवलं आणि पाण्यात वाहूनही गेलं अशीच काहीशी कथा खरिपातील सर्वच पिकांची झाली आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात तर (Farm Land Damage) शेत जमिनीही खरडून गेल्याचे प्रकार झाले आहेत. तर साठलेल्या पाण्यामुळे पिके सडतील अशी भीती व्यक्त होत आहे. हे सर्व असले तरी पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीकामेही करणेही मुश्किल झाले आहे.
पावसामुळे शेतीकामेही रखडली
अधिकच्या पावसामुळे पिके सडण्याच्या मार्गावर आहेत तर काही ठिकाणी पिवळेही पडलेली आहेत. अशा परस्थितीमध्ये पीक फवारणीचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. मात्र, पावसाची संततधार आणि शेत जमिनीत वाफसा नसल्याने शेतकऱ्यांना तणनाशक फवारणी, पाण्याचा निचरा करणे, निंदन, डवरे यासारखी कामे करता येत नाहीत. गेल्या 10 दिवसांपासून पावसामध्ये सातत्य असल्याने शेतशिवराचे चित्रच बदलून गेले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकांचे नुकसान होत असतानाही शेतकरी हताश आहे. शेतामध्ये कोणते कामच करता येत नसल्याने पिके धोक्यात आहेत. वाफसा मोडल्याशिवाय शेतकऱ्यांना कोणतीच हालचाल करता येणार नाही.
मजुरांचेही हाल, हाताला कामच नाही
दरवर्षी पेरणी झाली पिकांची मशागतीची कामे असतात. त्यामुळे मजुरांच्या हातालाही कामे मिळतात. यंदा मात्र परस्थिती बदलेली आहे. ऐन पीक वाढीच्या दरम्यानच मुसळधार पावसामुळे पिके पाण्यात आहेत. त्यामुळे शेताकडे फिरकताही येत नाही. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे आणि मजुरांच्या हाताला काम देण्याची मागणी होत आहे. मात्र, अद्यापही पंचनाम्यासाठी ना महसूल विभागाचे अधिकारी फिरकले आहेत ना कृषी विभागाचे.
काय आहे पिकांची अवस्था?
यंदा खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी कडधान्याकडे पाठ फिरवली होती. परिणामी सोयाबीन आणि कापसाच्या क्षेत्रात ही वाढ झाली आहे. मात्र, पेरणी होताच सुरु झालेल्या पावसामध्ये 10 दिवस सातत्य राहिले. त्यामुळे सोयाबीन, कापूस ही मुख्य पिके तर पाण्यात आहेत. शिवाय आणखी दोन दिवस अशीच स्थिती राहिली तर मात्र, दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरणार नाही.