Bhandara : पीके पाण्यात, मिरचीवर मर रोगाचा प्रादुर्भाव, सर्वकाही नुकसानीचे..!
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपातील मुख्य पिकांची दुबार पेरणी तर करावी लागलेली आहे. असे असतानाही पिके ही धोक्यात आहेत. हे कमी म्हणून की काय आता भाजीपाल्याची देखील तीच अवस्था होत आहे. मर रोगामुळे मिरची पिवळी पडली आहे. त्यामुळे वाढीवर आणि भविष्यात उत्पादनावर याचा परिणाम होणार असल्याने शेतकरी आता दुबार लागवडीच्या तयारीत आहे.
भंडारा : पावसावर अवलंबून असलेला (Kharif Season) खरीप हंगाम यंदा पावसामुळे पाण्यात आहे. आतापर्यंत खरिपातील पिके पाण्यात होती. पण सततच्या पावसाने नुकसानीचे क्षेत्र तर वाढत आहे पण (Vegetable) भाजीपाल्याला देखील फटका बसत आहे. भंडारा जिल्ह्यात मुख्य पिकांबरोबर उत्पन्नाच्या आशेने शेतकरी हे मिरचीवर भर देतात. जिल्ह्यातील पवनी, तुमसर,मोहाडी, साकोली या भागात धान पिकाबरोबर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. धान पीक तर पाण्यात आहेतच पण ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस यामुळे (Outbreak of disease) मिरचीवरही मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. शेतकऱ्यांसमोर नवीन संकट येऊन उभे ठेपले आहे. मिरचीचे रोप नष्ट होत आहे. त्यामुळे उत्पादन तर सोडाच पण लागवडीवर केलला खर्च शेतकऱ्यांना पदरुन करावा लागत आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना पावसाची चिंता असते, यंदा मा अधिकच्या पावसामुळे शेती व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. रोप लागवड होताच पिके ही पिवळी पडत आहेत. त्यामुळे आता फवारणीवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
दुबार लागवडीची नामुष्की
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपातील मुख्य पिकांची दुबार पेरणी तर करावी लागलेली आहे. असे असतानाही पिके ही धोक्यात आहेत. हे कमी म्हणून की काय आता भाजीपाल्याची देखील तीच अवस्था होत आहे. मर रोगामुळे मिरची पिवळी पडली आहे. त्यामुळे वाढीवर आणि भविष्यात उत्पादनावर याचा परिणाम होणार असल्याने शेतकरी आता दुबार लागवडीच्या तयारीत आहे. त्यामुळे उत्पादन उशिराने शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम काय होतो? याचा प्रत्यय यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना येत आहे. अधिकचा खर्च करुन मिरचीची दुबार लागवड हाच पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे.
भंडाऱ्याच्या मिरचीला दिल्लीची बाजारपेठ
भंडाऱ्यात धान पिकाबरोबरच मिरची उत्पादन क्षेत्रातही वाढ होत आहे. येथील मिरचीला वेगळी चव असून राजधानी दिल्लीतून मागणी आहे. त्यामुळे चांगला दर आणि सहजरित्या मार्केट हे या मिरचीचे वेगळेपण असते. यंदा मात्र, चित्र वेगळे राहील असा अंदाज आहे. कारण लागवड उशिराने होत असल्याने सर्वकाही दिरंगाईनेच होणार आहे. त्यामुळे यंदा दिल्लीचे मार्केट शेतकऱ्यांना मिळते की नाही अशी अवस्था आहे. यंदा मर नावाचा रोगाने जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांन वर नवीनच संकट कोसळल्याने आर्थिक विवेचनेत सापडला आहे.
धानाप्रमाणेच मिरचीला मदत मिळावी
नैसर्गिकरित्या पिकांचे नुकसान झाले तर पीकविम्याच्या माध्यमातून खरिपातील मुख्य पिकांना नुकसानभरपाई मिळते. मात्र, भाजीपाल्यासाठी अशी काही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे नुकसान झाले तरी दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. सध्या धान पिकाबरोबरच खरिपातील भाजीपालाही पाण्यात आहे. त्यामुळे पिकांची नुकसानभरपाई देताना मिरचीच्या नुकसानबाबत आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शासन आता काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.