Untimely Rain: अवकाळीची अवकृपा सुरुच, आता थेट उत्पादनावर परिणाम

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम आता फळबागांवरच झाला असल्याचे पाहवयास मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून हे संकट कायम असून आता कोकणातील फळबागा अंतिम टप्प्यात असतानाही सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे.

Untimely Rain: अवकाळीची अवकृपा सुरुच, आता थेट उत्पादनावर परिणाम
अवकाळीनंतर आता वाढत्या उन्हामुळे आता फळगळतीचा धोका
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 12:45 PM

सिंधुदुर्ग : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम आता फळबागांवरच झाला असल्याचे पाहवयास मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून हे संकट कायम असून आता (Konkan) कोकणातील फळबागा अंतिम टप्प्यात असतानाही सुरु असलेल्या (Untimely Rain) अवकाळी पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. महिन्याकाठी वातावरणातील बदलामुळे या भागातील आंबा, काजू या फळबागांबरोबरच आता रब्बी हंगामातील पिकांसह भाजीपाल्याचेही (Damage to Crop) नुकसान होत आहे. आतापर्यंत झालेले नुकसान हे औषध फवारणी करुन भरुन काढण्यासारखे होते पण आता फळबागा ऐन काढणीला आल्या असताना होणारे नुकसान कसे भरुन काढावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कोकणातील शेतकऱ्याची आर्थिक उलाढाल ही शेतीवर अवलंबुन असते.अशा परिस्थितीत कोरोनाची महामारी,शेतीसाठी काढलेले कर्ज आणि वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती अशा परिस्थितीत तळकोकणातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे., ,

सततच्या पावसामुळे निम्म्यानेच उत्पादनात घट

यंदा कोकणातील फळबागांना मोहर लागल्यापासून अवकाळीची अवकृपा ही सुरु झालेली आहे. त्यामुळे पहिल्या हंगामातील मोहर गळती झाल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला होता. आता काजु च्या झाडांना आलेला मोहर पुर्णत: गळून गेला आहे. त्यामुळे दरवर्षी जे काजूचे पीक 10 ते 15 क्विंटल एवढे घेत होते त्यांना या वर्षी एक क्विंटल पण मिळणार नाही अशी अवस्था झाली आहे. काजुप्रमाणेच आंबा ह्या मुख्य फळाची अवस्था झालेली आहे. दुसऱ्या हंगामात आलेला मोहोर पावसामुळे गळून गेला तर नवीन मोहोराला किडीने घेरलय त्यामुळे यंदा आंबा पिकाचे फारच नुकसान होणार आहे. तसेच मध्यंतरीच्या काळात खारी पडल्यामुळे रब्बी हंगामातील पीके देखील जळाली आहेत.

शेतीवरच सर्वकाही अवलंबून

कोकणातील नागरिकांचे अर्थकारण हे शेतीवरच अवलंबून आहे. असे असताना नैसर्गिक संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. बदलत्या वातावरणामुळे आणि या पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे काजु-आंबा पिक ,रब्बी हंगामातील कडधान्याची पिके,मिरची ही पिके देखील संकटात आली आहे .कोकणातील शेतकऱ्याची आर्थिक उलाढाल ही शेतीवर अवलंबुन असते.अशा परिस्थितीत कोरोनाची महामारी,शेतीसाठी काढलेले कर्ज आणि वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती अशा परिस्थितीत तळकोकणातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक

वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम फळबागांवर होतो. यंदा तर ऐन मोहर लागण्याच्या दरम्यानच अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुके यासारख्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते. मात्र, यामधून फळबागा जोपासल्या जाव्यात म्हणून पदपमोड करुन शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत होते. उत्पादनावर होणारा एकरी खर्च हा दुपटीने वाढलेला आहे. असे असताना केवळ झालेला खर्च तरी पदरी पडावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत मात्र, अंतिम टप्प्यातही अवकाळीची अवकृपा सुरुच असल्याने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या :

चोरट्यांनी हेही सोडलं नाही, रात्रीतून 20 टन टरबुज लंपास, 75 दिवसांची शेतकऱ्याची मेहनत मातीमोल

Washim Market Committee : बाजार समितीचा निर्णय एक अन् फायदे अनेक, शेतकऱ्यांच्या मागणीला प्रशासनाचे पाठबळ

महारेशीम अभियानाचा उद्देश साध्य, आता उत्पादनवाढीसाठी विशेष प्रयत्न, शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा ?

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.