रब्बी अंतिम टप्प्यात तरी शेतकऱ्यांना प्रतिक्षा हक्काच्या पाण्याची, पाटबंधारे विभागाने ‘लिफ्ट’च दिली नाही
शेती व्यवसयात सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणूनच बंधाऱ्यांची उभारणी झाली होती. पण काळाच्या ओघात पिण्यासाठीच पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने यामध्ये बदल करुन आगोदर पिण्यासाठी आणि नंतर शेतीसाठी हे धोरण ठरविण्यात आले होते. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला होत्या त्यामुळे शेती सिंचनासाठी असलेले राखीव पाणी मिळणार अशी घोषणा करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही शेतकऱ्यांना हे हक्काचे पाणी मिळालेले नाही.
नांदेड : शेती व्यवसयात सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणूनच बंधाऱ्यांची उभारणी झाली होती. पण काळाच्या ओघात पिण्यासाठीच पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने यामध्ये बदल करुन आगोदर पिण्यासाठी आणि नंतर शेतीसाठी हे धोरण ठरविण्यात आले होते. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला होत्या त्यामुळे शेती सिंचनासाठी असलेले राखीव पाणी मिळणार अशी घोषणा करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही शेतकऱ्यांना हे हक्काचे पाणी मिळालेले नाही. जिल्ह्यातील विष्णुपुरी बंधाऱ्यातूनही डेरला लिफ्टद्वारे पाणी सोडण्यााची घोषणा पाटबंधारे विभागाने केली होती पण फेब्रुवारी महिना अंतिम टप्प्यात असतानाही एक थेंबही शिवारापर्यंत पोहचलेला नाही. त्यामुळे बंधारा तुडूंब भरला काय आणि कोरडाठाक झाला काय? याचा फायदा शेतकऱ्यांना नाहीच अशीच भावना शेतकऱ्यांची झाली आहे.
शेतीसाठी 90 दशलक्ष घनमीटर पाणीसाठी
यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वच बंधारे हे तुडूंब भरले आहेत. दरम्यान, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटला असून शेतकऱ्यांना यंदाचे हक्काचे पाणी दिले जाणार असल्याची घोषणा पाटबंधारे विभागानेच केली होती. शिवाय जानेवारी महिन्यापर्यंत शेतकऱ्यांनाही टंचाई भासलेली नव्हती. पण आता उन्हामध्ये वाढ होत असल्याने जलसाठ्यांना तळ गाठलेला आहे. त्यामुळे पाण्याची गरज असतनाही पुरवठ्याकडे दुर्लक्ष होत आहे. विष्णुपुरी बंधाऱ्यात 90 दशलक्ष घनमीटर पाणी हे शेतीसाठी राखीव आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे पण पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
डेरला लिफ्टला एकही पाळी नाही
डेरला लिफ्टच्या माध्यमातून उंच भागावरील जमिन क्षेत्र सिंचनाखाली यावे हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळेच याची उभारणी करण्यात आली आहे. शिवाय यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने पिकांना पाणी मिळेल आणि उत्पादनात वाढ होईल असा आशावाद होता. पण हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही अंमलबजावणीच झालेली नाही. त्यामुळे वडेपुरी, हरबल, सोनखेड या उंच भागातील शेतकरी हैराण झाले आहेत.
पिके बहरात असतानाच पाणीटंचाई
पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील ही बहरलेली आहेत. पण जलस्त्रोतांनी तळ गाठला असल्याने डेरला लिफ्टद्वारे पाणी मिळावे हा शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.शिवाय वाढत्या उन्हामुळे पिके माना टाकत आहेत. त्यामुळे डेरला लिफ्टद्वारे पाणी त्वरीत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचे भाव वधारले, शेतकऱ्यांमध्ये समाधान
वाशीम जिल्ह्यातील करडई पीकाचे लागवड क्षेत्र वाढले, करडई पीकाचा आरोग्यासाठी काय आहे फायदा ?