अवकाळीनंतर डाऊनी मिल्डयुचा वाढतोय प्रादुर्भाव, द्राक्ष खराब होण्यापूर्वी असे करा नियंत्रण

| Updated on: Dec 14, 2021 | 7:24 AM

अवकाळी पावसाने व त्यानंतर निर्माण झालेल्या परस्थितीमुळे सर्वाधिक नुकसान हे फळबागांचे झाले आहे. वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागांवर डाऊनी मिल्ड्यू, करपा, याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. बहुतांश द्राक्ष बागा या फुलोरा ते फळधारणा या अवस्थेत असातनाच पावसामुळे मणीगळ व घडकूज या समस्यांसोबतच डाऊनी मिल्ड्यूचा धोकाही वाढत आहे.

अवकाळीनंतर डाऊनी मिल्डयुचा वाढतोय प्रादुर्भाव, द्राक्ष खराब होण्यापूर्वी असे करा नियंत्रण
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : अवकाळी पावसाने व त्यानंतर निर्माण झालेल्या परस्थितीमुळे सर्वाधिक नुकसान हे फळबागांचे झाले आहे. वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागांवर (pest infestation) डाऊनी मिल्ड्यू, करपा, याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. बहुतांश द्राक्ष बागा या फुलोरा ते फळधारणा या अवस्थेत असातनाच पावसामुळे (Damage to vineyards) मणीगळ व घडकूज या समस्यांसोबतच डाऊनी मिल्ड्यूचा धोकाही वाढत आहे. कारण पूर्वी नियंत्रित झालेल्या डाऊनी मिल्ड्यू ( climate change) रोगाचे बिजाणू पुन्हा सक्रिय होऊ लागतील. त्यामुळे अनेक ठिकाणी वाढीच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष मण्यांवरसुद्धा डाऊनी मिल्ड्यू हा वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. या अवस्थेत डाऊनी मिल्डयूचा प्रादुर्भाव झाल्यास घड हे कुजून मण्यांचा दर्जा घसरु शकतो.

डाऊनी मिल्ड्यू चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी असे करा व्यवस्थापन

या रोगाचा परिणाम थेट द्राक्षांच्या घडावर होत आहे. त्यामुळे वेळेत उपाययोजना केली नाही तर थेट द्राक्ष तोडून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. असे प्रकार पंढरपूर, सोलापूर सांगली येथे घडलेले आहेत. हे टाळाव्यासाठी अमिसूलब्रोम 17.7 % एस.सी. या स्पर्शजन्य बुरशीनाशकाची 0.38 मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. किंवा डायमिथोमॉर्फ 50 डब्ल्यू.पी. 0.50 ग्रॅम प्रति 1 लिटर किंवा मॅडीप्रोपॅमीड एस . सी. 0.8 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकांचाही वापर करता येईल.

दव जास्त पडत असल्यास असे करा नियोजन

अवकाळी पावसानंतर आता काही भागात दव पडत आहे. ज्याभागांमध्ये दव जास्त प्रमाणात पडत आहे, अशा भागामध्ये डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी निर्यातक्षम द्राक्ष घेणाऱ्या शेतकन्यांनी मेतीराम ७० डब्ल्यू. पी या बुरशीनाशकांची 5 किलो प्रति एकर या प्रमाणे धुरळणी करावी. स्थानिक बाजारपेठेत जाणाऱ्या द्राक्षांसाठी मॅन्कोझेब 75 डब्ल्यूपी या बुरशीनाशकाचा 5 किलो प्रति एकर या प्रमाणे धुरकणीद्वारे वापर करता येईल. या सोबत पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फोरस 4 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणीही उपयोगी ठरते.

द्राक्ष बागांवर भुरीचाही प्रादुर्भाव

* डाऊनी मिल्ड्यूसोबतच काही भागांमध्ये भुरीचाही प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. भुरीच्या नियंत्रणासाठी सायफ्ल्यूफेनामाइड 0.5 मि.लि. प्रति लिटर किंवा मेट्राफेनॉन 0.25 मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी घेणे फायद्याचे होईल. शिवाय अधिक प्रमाणात भुरीचा प्रादुर्भाव झाल्यास सल्फर डी. जी. या बुरशीनाशकाची 2 ग्रॅम प्रति लिटर या दराने फवारणी करावी.

* जैविक बुरशीनाशकाचा भुरीच्या नियंत्रणासाठी 5 मि.लि. प्रति लिटर य प्रमाणे वापर करावा. ट्रायकोडर्मा 2-3 मि.लि. प्रति लिटर व बॅसिलस स्पेसीज 2 मि.लि. प्रति लिटर ही जैविक बुरशीनाशकेही भुरी नियंत्रणासाठी उपयोगी असल्याने त्यांचा बागेतील वापर सुरुच ठेवावा. जैविक नियंत्रक घटक व रासायनिक बुरशीनाशक एकत्रित करून वापरू नयेत. रासायनिक बुरशीनाशकांच्या अति वापरामुळे घडकूज होऊन किंवा जखमा होऊन द्राक्षाच्या विपरीत परिणाम होतो. म्हणून रासायनिक घटकांचा अतिवापर करणे टाळावे.

संबंधित बातम्या :

…अखेर ज्याची भीती होती तेच झाले, ऑनलाईन-ऑफलाईनच्या घोळात पिक विम्याचे पैसे अडकले

उशिराचे शहाणपण : 30 लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप, उर्वरीत रक्कम कधीपर्यंत होणार जमा?

Special News | सोयाबीन अन् सोयापेंड, नेमकं नातं काय ?