Sangli :निसर्गाचा लहरीपणा द्राक्ष बागायतदारांच्या मुळावर, आता द्राक्ष तोडणीनंतरही नुकासनीची मालिका सुरुच
द्राक्ष बागा मशागतीची कामे सुरु असतानाच सांगलीसह मिरज वाळवा आणि पलूस तालुक्यात जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला पलूस तालुक्यात नागठाणे येथे मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. द्राक्ष बागेमध्ये गाराच गारा असल्याचं दिसून येत होत्या.
सांगली : आता द्राक्ष तोडणीनंतर पावसाने काय नुकसान होणार असा तुम्हाला प्रश्न पडला असेल पण तोडणी झाली की लागलीच छाटणी आणि इतर कामांना सुरवात होते. (Unseasonable Rain) अवकाळीमुळे झालेले नुकसान बाजूला सारुन शेतकऱ्यांनी बागा छाटणी केल्या आहेत. आतापर्यंत अवकाळीचा परिणाम होत होता पण गुरुवारी (Sangli) जिल्ह्यातील मिरज, वाळवा तालुक्यात तर गारपिटीनेच थैमान घातले होते. यामुळे द्राक्ष वेलींचे नुकसान झाले असून यंदा हंगामातच नाही तर (Vineyard) द्राक्ष जोपासत असतानाच नुकसानीला सुरवात झाल्याने उत्पादक चांगलेत धास्तावले आहेत. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्याने द्राक्ष बागांना त्याचा फटका बसला आहे. तर घाटनांद्रे कुची येथे नारळाच्या झाडावर वीज पडून झाड जळाले.
द्राक्ष बागेत गाराच-गारा
सांगली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पाऊस बरसत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभती येत आहे. नागरिकांना पावसामुळे वाढत्या उन्हापासून दिलासा मिळाला असला तरी शेती पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागा मशागतीची कामे सुरु असतानाच सांगलीसह मिरज वाळवा आणि पलूस तालुक्यात जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला पलूस तालुक्यात नागठाणे येथे मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. द्राक्ष बागेमध्ये गाराच गारा असल्याचं दिसून येत होत्या.
बाग छाटणीनंतर वेलींचे नुकसान
द्राक्ष तोडणीनंतर झालेले नुकसान बाजूला सारुन शेतकऱ्यांनी आगामी काळात उत्पादन वाढवण्याचा निर्धार केला आहे. त्याअनुशंगाने द्राक्ष छाटणीची कामे पूर्ण करुन आता बागांना वेली फुटल्या आहेत. असे असतानाच झालेल्या गारपिटमुळे द्राक्ष वेलींचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत द्राक्ष लागल्यानंतर नुकसान झाले होते पण आता तर मशागतीची कामे सुरु असतानाच हे संकट ओढावल्याने बागा जोपासाव्या तरी कशा असा सवाल उपस्थित होत आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाने जनजीवन विस्कळीत
सांगली जिल्ह्यातील विविध भागांमध्ये होत असलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, सगल आठ दिवस पाऊस होत असल्याने आता जनजीवन विस्कळीत होत आहे. भर उन्हाळ्यात सांगलीकरांना पावसाळ्याची अनुभती येत आहे. असेच वातावरण राहिले तर शेती मशागतीची कामे लांबणीवर पडणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.