Mango : फळांच्या राजा यंदा निसर्गाच्या कचाट्यात, उत्पादन घटल्याने चवही महागणार

यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रात द्राक्ष बागांचे तर कोकणामध्ये आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हंगामाच्या सुरवातीपासूनच अतिवृष्टी, गारपिट, थंडीचा कडाका आणि आता काढणीच्या दरम्यान झालेली अवकाळी. सर्वकाही नुकसानीचे झाल्याने यावर्षी एकूण उत्पादनापैकी केवळ 20 ते 25 टक्केच उत्पादन बागायतदारांच्या पदरी पडणार आहे.

Mango : फळांच्या राजा यंदा निसर्गाच्या कचाट्यात, उत्पादन घटल्याने चवही महागणार
हापूस आंबा
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 9:42 AM

रत्नागिरी: यंदा  (The whimsy of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रात द्राक्ष बागांचे तर (Kokan) कोकणामध्ये आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हंगामाच्या सुरवातीपासूनच (Heavy Rain) अतिवृष्टी, गारपिट, थंडीचा कडाका आणि आता काढणीच्या दरम्यान झालेली अवकाळी. सर्वकाही नुकसानीचे झाल्याने यावर्षी एकूण उत्पादनापैकी केवळ 20 ते 25 टक्केच उत्पादन बागायतदारांच्या पदरी पडणार आहे. फळांच्या राजा म्हणून ओळख असलेल्या हापूसला सबंध देशभरातून मागणी असते. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा खवय्यांना या आंब्याची चव चाखण्यासाठी तब्बल महिनाभराची प्रतिक्षा करावी लागली आहे. असे असले तरी उत्पादनात मोठी घट झाल्याने याचा परिणाम आता दरावर पाहवयास मिळत आहे. आता कुठे बाजारपेठेत हापूसची आवक सुरु झाली आहे. मात्र, वाढत्या दरामुळे ग्राहक याला कसा प्रतिसाद देणार ते पहावे लागणार आहे.

तीन टप्प्यात घेतलं जात आंब्याचे उत्पादन

कोकणात आंब्याचे उत्पादन हे तीन टप्प्यात घेतले जाते. जानेवारी महिन्यापासूनच याची सुरवात होते. पण याच कालावधीपासून सुरु झालेल्या निसर्गाच्या लहरीपणाचा सामना आंबा उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागला होता. सुरवातीला अवकाळीमुळे मोहरला धोका निर्माण झाला तर यातून सावरत असताना पुन्हा गारपिटीशी दोन हात करावे लागले होते. निसर्गाच्या अवकृपेमुळे तीन्हीही टप्प्यातील उत्पादन वेळेत शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. परिणामी अधिकचा खर्च करुनही शेतकऱ्यांचे उद्दीष्ट मात्र, साध्य झाले नाही.

जानेवारीपासून 1 लाख पेट्यांमधून हापूसची आवक

यंदा आंबा बाजारपेठेत दाखल होण्यास वेळ झाला असला तरी मुंबई बाजारपेठेतच त्याचा श्रीगणेशा झाला आहे. प्रतिकूल परस्थितीमध्येही जानेवारी महिन्यापासून मार्चपर्यंत येथील वाशी मार्केट 1 लाख पेट्यांमधून हापूसची आवक झाली आहे. तर 10 हजार पेट्यांची निर्यात ही आखाती देशांमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये दुबई, ओमान आणि कुवेत या देशांचा समावेश आहे.

बागायतदार शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाईची अपेक्षा

निसर्गाच्या लहरीपणामुळे बागायतदार शेतकऱ्यांवरही नुकसान भरपाई मागण्याची नामुष्की ओढावली आहे. गेल्या वर्षभरात झालेला खर्च आणि पदरी पडलेले उत्पादन याचा कुठेही मेळ लागत नसल्याने आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. आतापर्यंत कोकणातील आंब्याची चव सर्वांनी चाखली पण आता उत्पादकच अडचणीत आला असून सरकारने मदत करावी अशी अपेक्षा रत्नागिरीतील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Rabi Season : उन्हाळी हंगामातील मका जोमात पण ‘मर’ रोगामुळे कोमात, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

Grape Damage : अवकाळीचा परिणाम थेट द्राक्ष दरावर, शेतकऱ्यांकडे आता एकच पर्याय..!

सोयाबीनची साठवणूक अन् हरभऱ्याची विक्री, काय स्थिती आहे खरेदी केंद्रावरची?

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.