Pomegranate : खोडकिडीचा परिणाम थेट डाळिंब निर्यातीवर, किडीमुळे उत्पादनात घट नाही तर बागाच नष्ट, वाचा सविस्तर

किडीमुळे उत्पादनात घट होऊ शकते मात्र, डाळिबांवरील खोडकिडीमुळे थेट बागाच उध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान सध्या होत असून ज्या भागात अधिकचे क्षेत्र आहे त्याच भागाच या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेष म्हणजे यावर अद्यापही तोडगा काढण्यास डाळिंब संशोधन विभागाला यश आलेले नाही.

Pomegranate : खोडकिडीचा परिणाम थेट डाळिंब निर्यातीवर, किडीमुळे उत्पादनात घट नाही तर बागाच नष्ट, वाचा सविस्तर
वातावरणातील बदलामुळे डाळिंब बागेवर परिणाम झााल आहे, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 10:59 AM

सोलापूर : किडीमुळे उत्पादनात घट होऊ शकते मात्र, डाळिबांवरील खोडकिडीमुळे थेट बागाच उध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान सध्या होत असून ज्या भागात अधिकचे क्षेत्र आहे त्याच भागाच या (Pest Outbreak) किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेष म्हणजे यावर अद्यापही तोडगा काढण्यास (Pomegranate Research) डाळिंब संशोधन विभागाला यश आलेले नाही. त्यामुळे खोडकि़डीचा प्रादुर्भाव झाला की, एकतर डाळिंबाचे झाड हे जागेवर जळून तरी जाते अन्यथा शेतकऱ्यांना तोडून बांधावर टाकावे लागते. यामुळे यंदाच्या डाळिंब निर्यातीवर खोडकिडीचा मोठा प्रभाव जाणवला आहे. गेल्या दोन महिन्यापासून (Pomegranate Export) डाळिंब निर्यातीची प्रक्रिया सुरु असून आतापर्यंत केवळ 500 टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. उत्पादनात निम्म्यापेक्षा अधिकची घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका तर बसलेला आहेच पण ज्या भागात अधिकचे उत्पादन घेतले जाते तिथे डाळिंबाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र

डाळिंब बागांसाठी कोरडवाहू क्षेत्र अधिक चांगले असते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि इतर तालुक्यांमध्ये डाळिंबाचे क्षेत्र हे वाढलेले आहे. शिवाय याकरिता पाणीही कमी लागते. देशात तब्बल 2 लाख 80 हजार हेक्टरावर डाळिंबाच्या बागा आहेत. पैकी 1 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र केवळ महाराष्ट्रात आहे. यानंतर मध्यप्रदेश, राज्यस्थान, गुजरात, कर्नाटक या राज्यांध्येही डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, वातावरणातील बदल आणि खोडकिडीसारख्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव थेट डाळिंबाच्या अस्तित्वापर्यंतचा विषय बनला आहे.

खोडकिडीमुळे नेमके काय होते?

डाळिंबाच्या बागा बहराक आल्या की या खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे शेतकऱ्यांना बागेबाबत कोणता निर्णयही घेता येत नाही. मात्र, खोडकिडीमुळे एकतर डाळिंबाचे झाड हे जागेवरच नष्ट होते कींवा ते वाळल्यामुळे शेतकऱ्यांना काढून बांधावर फेकावे लागते. शिवाय असे केले नाही तर त्याचा प्रादुर्भाव इतर पिकांना होता. आणि अवघ्या काही दिवसांमध्येच संपूर्ण बागच नष्ट होते. गेल्या दोन वर्षापासून डाळिंबाला योग्य मार्केट नव्हते आता मागणी वाढली आहे तर उत्पादन घटले आहे.

कशामुळे बदलले चित्र?

पोषक वातावरण आणि दर्जेदार उत्पादनामुळे अल्पावधीच सांगोल्याची डाळिंबे ही सातासमुद्रापार गेली होती. शिवाय येथील अत्यल्प पर्जन्यमान, उष्ण हवामान व डाळिंबासाठी पोषक वातावरण यामुळे तब्बल 35 हजार हेक्टरावर डाळिंबाच्या बागा बहरत होत्या. मात्र, वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका डाळिंब बागांना बसलेला आहे. डाळिंबावर तेल्या रोग त्यानंतर मर आणि आता नव्यानेच बोरर या खोडकिडीचे आक्रमण यामुळे बागा जोपासणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. खोडकिडीने संपूर्ण झाडच वाळून जात आहे तर तेल्या रोगावर अद्यापही योग्य औषध उपलब्ध झालेले नाही. हीच कारणे आहेत डाळिंब बागेच्या तोडणीची. त्यामुळे शेतकरी नव्या पर्यायाचा शोध घेत आहेत.

संबंधित बातमी :

Banana : हमी पीक झाले बेभरवश्याचे, केळीवर कीडीचा प्रादुर्भाव अन् विम्यासाठी शेतकऱ्यांची परवड

काळ्या मिरचीची गोष्टच न्यारी लागवड सोपी अन् उत्पादन भारी, तीन महिन्यांमध्ये शेतकरी मालामाल

POCRA : ‘पोकरा’चे रखडलेले अनुदान थेट खात्यामध्ये, पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.