पेरले-उगवले अन् बहरात असतानाच पीक जळून गेले, नेमके मका पिकाबाबत असे झाले तरी काय?
पेरले तेच उगवते इथपर्यंत सर्वकाही ठिक होते. मात्र, मका पीक हे चार महिन्याचे असतानाही तीन महिन्याच्या आतमध्येच सुकू लागले. नेमका हा प्रकार काय आहे हे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लक्षात आले नाही. बरं एका शेतकऱ्याच्या बाबतीत नाही तर तालुक्यातील पहुरी खुर्द येथील 8 ते 10 शेतकऱ्यांच्या शेतातली हीच अवस्था.
औरंगाबाद : ‘पेरले तेच उगवते’ इथपर्यंत सर्वकाही ठिक होते. मात्र, (Maize Crop) मका पीक हे चार महिन्याचे असतानाही तीन महिन्याच्या आतमध्येच सुकू लागले. नेमका हा प्रकार काय आहे हे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लक्षात आले नाही. बरं एका शेतकऱ्याच्या बाबतीत नाही तर तालुक्यातील पहुरी खुर्द येथील 8 ते 10 शेतकऱ्यांच्या शेतातली हीच अवस्था. (Rabbi Season) रब्बी हंगामात उत्पादन आणि जनावरांना चारा म्हणून मकाचे क्षेत्र वाढले आहे. (Crop Sowing) पीक पेरणीनंतर कणीस येण्याच्या अवस्थेतच मका सुकून जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार बियाणे कंपनीला संपर्क करण्यात आला मात्र, कुठलीच दाद मिळाली नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी थेट कृषी केंद्रसंचालक, बियाणे कंपनी तालुका कृषी कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर बियाणातच खोट असल्याचे समोर आले आहे.
या वाणाच्या बियाणालाच समस्या
आजही ग्रामीण भागात एखाद्या शेतकऱ्याने नवे बियाणे आणले तर इतर शेतकरी त्याचे अनुकरण करतात. अगदी त्याप्रमाणेच पहुरी खुर्द येथे नाना परशुराम निकम यांनी ब्रिव्हेंट कंपनीच्या 30V92 या बियाणाची खेरदी केली. त्यांचे पाहून गावातील इतर 10 जणांनीही तेच बियाणे आणले. 30 ऑक्टोंबर रोजी परणी केली आणि आता कणीस लागण्याच्या अवस्थेत मका पीक हे सुकून जागेवरच जळू जात आहे. असाच प्रकार इतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये झाला आहे. याच वाणाचे बियाणेच निकृष्ट असल्याने शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.
दुष्काळात तेरावा, शेतकऱ्यांची फसवणूक
एकीकडे शेतकऱ्यांना निसर्गाशी दोन हात करावे लागत आहेत. असे असतानाच तीन महिने पीक जोपासून पुन्हा असे न भरुन निघणारे नुकसान होत असल्याने शेतकरी हताश होत आहेत. बोगस बियाणांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. यासंदर्भात कृषी केंद्राशी संपर्क साधूनही शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे.
पंचनाम्यातून काय आले समोर?
संबंधित शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईच्या अनुशंगाने कृषी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. कृषी पिकांची पाहणी केली शिवाय बियाणे खरेदीच्या पावत्या पाहून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. त्यामुळे आता काय निर्णय होणार यावर नुकसानभरपाई अवलंबून आहे.
संबंधित बातमी :
Photo : डोळ्यांदेखतच स्वप्नांचा चुराडा, तोडणी सुरु असतानाच 30 एकरातील ऊस जळून खाक
Sugarcane Sludge : उत्तर महाराष्ट्रात वाढला ऊसाचा ‘गोडवा’ पण शेतकऱ्यांच्या मागण्याही होणार का पूर्ण?