Lemon Production: मागणी वाढली अन् उत्पादन घटलं, नैसर्गिक संकटाने सर्वकाही हिरावलं
वर्षभर झालेला अवकाळी पाऊस हा नुकसानीचाच ठरत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम आतापर्यंत खरीप आणि रब्बी हंगामावर तर झालेलाच होता पण सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लिंबू उत्पादनावरही परिणाम होऊ लागला आहे. वातावरणातील बदलामुळे झालेल्या नुकसानीतून आता लिंबू पिकाचीही सुटका नाही अशीच स्थिती ओढावली आहे. उन्हाळ्यात लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे 50 रुपये किलो असलेली लिंब ही शंभरच्या पार गेली आहेत. तर दुसरीकडे उत्पादनात मोठी घट झाली आहे.
नांदेड : वर्षभर झालेला अवकाळी पाऊस हा नुकसानीचाच ठरत आहे. (Climate Change) वातावरणातील बदलाचा परिणाम आतापर्यंत खरीप आणि रब्बी हंगामावर तर झालेलाच होता पण सध्याच्या (Cloudy Weather) ढगाळ वातावरणामुळे (Lemon) लिंबू उत्पादनावरही परिणाम होऊ लागला आहे. वातावरणातील बदलामुळे झालेल्या नुकसानीतून आता लिंबू पिकाचीही सुटका नाही अशीच स्थिती ओढावली आहे. उन्हाळ्यात लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे 50 रुपये किलो असलेली लिंब ही शंभरच्या पार गेली आहेत. तर दुसरीकडे उत्पादनात मोठी घट झाली आहे. आतापर्यंत खरीप हंगामातील पिकांच्या बाबतीत जे झाले तेच आता हंगामी पिकांबाबत घडताना दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे फळधारणाच झाली नाही. परिणामी उत्पादन हे निम्म्यावर आले आहे. त्यामुळे लिंबाला विक्रमी दर मिळूनही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत नाही.
हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी दर
दर वर्षी उन्हाच्या झळा वाढल्या की, लिंबाच्या दरात वाढ ही ठरलेलीच आहे. यंदाही 50 रुपये किलोवर असलेले लिंबू थेट 100 ते 125 रुपये किलोवर पोहचलेले आहे. असे असले तरी मध्यंतरीचा अवकाळी पाऊस आणि सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे फळधारणाच झालेली नाही. ऐन उत्पादन पदरी पडणार तेवढ्यात निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरत आहे. आतापर्यंत द्राक्ष, आंबा आणि आता लिंबूचे नुकसान सुरु झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी केलेले प्रयोग फोल ठरत आहेत.
लिंबाची आयात सुरु
ऐन उन्हाळ्यात लिंबू विकायला यावेत म्हणून शेतकऱ्यांकडून योग्य ते नियोजन केले जाते. त्यानुसारच लागवडही ठरते. यंदा मात्र, शेतकऱ्यांनी नियोजन केले पण निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वकाही वाया गेले आहे. परिणामी स्थानिक शेतकऱ्यांकडे लिंबू नसल्याने व्यापाऱ्यांना लिंबाची आयात करण्याची नामुष्की ओढावली आहे. माल असला तर योग्य ती किंमत मिळत नाही आणि विक्रमी दर असला तर माल नाही हे आता नित्याचेच झाले आहे. सध्या लिंबाची आयात करुन तब्बल 150 रुपये किलो प्रमाणे लिंबाची विक्री केली जात आहे. अशीच परस्थिती राहिली तर लिंबापासून बनविण्यात येणाऱ्या थंडपेयाच्या किंमती देखील वाढतील असा अंदाज आहे.
बागा बहरल्या पण मोहर गळला
फळबागा आणि रब्बी हंगामासाठी सर्वकाही पोषक असताना एका रात्रीतून चित्र बदलत आहे. ज्वारी, गहू, हरभरा याबरोबरच लिंबाच्या बागाही बहरात होत्या. पण गेल्या आठ दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे लिंबाचा मोहर गळाला आहे.तर त्यामुळे ऐन हंगामात फळधारणाच झालेली नाही. शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.
संबंधित बातम्या :
Agricultural : कृषी विभागात महाघोटाळा, कॉंग्रेसच्या नेत्याची अधिकाऱ्याविरोधात ‘ईडी’ कडे तक्रार