Red Chilly : पाच वर्षानंतर झोंबणार धर्माबादची लाल मिरची, हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी दर
अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला असला तरी त्याची कसर ही वाढत्या दरातून निघत आहे. आतापर्यंत खरिपातील सोयाबीन, कापूस आणि तुरीबद्दल जे होत आहे तेच हंगामी पिकांबाबत होत असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. जिल्ह्यातील धर्माबाद येथील बाजारपेठ ही लाल मिरचीसाठी प्रसिध्द आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून लाल मिरचीची आवक ही कमी झाली होती. यंदा मात्र, धर्माबादसह परिसरातील शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन लाल मिरचीचे उत्पादन घेतले होते.
नांदेड : अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला असला तरी त्याची कसर ही वाढत्या दरातून निघत आहे. आतापर्यंत खरिपातील सोयाबीन, कापूस आणि तुरीबद्दल जे होत आहे तेच हंगामी पिकांबाबत होत असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. जिल्ह्यातील (Dharmabad Market) धर्माबाद येथील बाजारपेठ ही (Red Chilly) लाल मिरचीसाठी प्रसिध्द आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून लाल मिरचीची आवक ही कमी झाली होती. यंदा मात्र, धर्माबादसह परिसरातील शेतकऱ्यांनी (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करुन लाल मिरचीचे उत्पादन घेतले होते. शिवाय वाढत्या दरामुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत दिवसाकाठी 150 ते 200 क्विंटल लाल मिरचीची आवक होत असून 2 हजार 200 रुपये क्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. ही बाजारपेठ तेलंगणा राज्याला लागूनच असल्याचाही मोठी फायदा होत आहे.
यामुळे धर्माबादच्या मिरचीला वेगळे महत्व
धर्माबादच्या मिरचीचा लाल तिखट तयार करण्यासाठी सर्वाधिक वापर केला जातो. सध्या लाल तिकटाचे दर हे वाढलेले आहेत शिवाय या भागात लाल पावडर करण्याचे प्रक्रिया उद्योगांनीही भरारी घेतली आहे. उत्पादन आणि बाजारपेठ याचा मेळ लागत असल्याने पुन्हा मिरची लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी लाल मिरचीचे दर 150 रुपेय किलो होते तर यंदा यामध्य़े वाढ होऊन 200 ते 220 पर्यंतचा दर मिळत आहे. लाल मिरचीचा तडका हेच या मिरचाचे वेगळेपण असून परराज्यातूनही मागणी वाढत आहे.
तेलंगणातूनही आवक वाढली
धर्माबादची बाजारपेठ ही तेलंगणातील शेतकऱ्यांसाठी सोईची आहे. शिवाय अधिकचा दर आणि आवक वाढली तरी दरावर परिणाम हे बाजार समितीचे वैशिष्ट असल्याने तेलंगणातून मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची आवक होत आहे. वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षांपासून लागवड क्षेत्रात घट झाली होती. पण यंदा चित्र बदलताना दिसत आहे. आवकही वाढली असून दरही वाढत आहे. सध्या 7 हजारापसून ते 22 हजार रुपये क्विंटल असे दर मिळत आहे. त्यामुळे पुन्हा लाल मिरचीचे गतवैभव मिळताना दिसत आहे.
प्रक्रिया उद्योगालाही चालना
धर्माबादसह तेलंगणातील काही भागातील भौगोलिक वातावरणामुळे येथील मिरचीला एक वेगळीच चव असून सर्वाधिक तिकट मिरची असल्याचे सांगितले जाते. वाढत्या बाजारपेठेबरोबरच या भागात लाल पावडर करण्याचे कांडपही सुरु झाले आहेत. बाजारपेठ आणि लाल तिकट एकाच ठिकाणी मिळत असल्याने निझामबाद, हैदराबाद, कामारेडी, म्हैसा, बोधन, साठापूर या ठिकाणाहूनही व्यापारी मिरची पावडर खरेदी करण्यासाठी दाखल होत होते.
संबंधित बातम्या :
राज्यात 5 हजार 142 गावांमध्ये राबवणार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना; कसा होणार शिवाराचा कायापालट?
काशीफळ, दुधी भोपळा पीक 3 महिन्यांचे, पण उत्पन्न लाखोंचे; कसे कराल व्यवस्थापन?
Nandurbar : जाळायचे होते पाचट अन् जळाला ऊस, अवघ्या दोन तासात 12 एकरातील फड जळून खाक