Agricultural : तुरीचा पेरा घटला अन् दर वाढला, कसे बदलले मार्केटचे चित्र?
तूर आयातीमध्ये सातत्य असले देशांतर्गत बाजारपेठेत तुरीच्या दरात वाढ होऊ लागली आहे. आता केवळ म्यानमारमधून तुरीची आयात होत आहे. लेमन तुरीची 7 हजार 200 रुपये प्रमाणे आयात होत असली देशातील दरही याबरोबरीवर पोहचले आहेत. तर दुसरीकडे मात्र, तुरीच्या क्षेत्रात घट झाली आहे. देशात 13.11 टक्क्यांनी क्षेत्र घटले आहे तर महाराष्ट्रात 11 टक्क्यांनी क्षेत्र घटले आहे.
लातूर : गतवर्षी हंगामाच्या सुरवातीपासूनच (Toor Rate) तुरीच्या दरात कमालीची घट झाली होती. 6 हजार 300 एवढा हमीभाव असताना देखील गेल्या सहा महिन्यात तुरीला एकदाही यापेक्षा अधिकचा दर मिळाला नव्हता. (Agricultural Market) बाजारपेठेतील घटते दर आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे सबंध देशात तुरीच्या क्षेत्रात 13.51 घट झाली आहे. एकीककडे (Toor Sowing) तुरीच्या पेऱ्यातील घटीचे आकडेवारी दिवसेंदिवस समोर येत असताना दुसरीकडे दरात झपाट्याने वाढ होत आहे. कधी नव्हे ते तुरीला 6 हजार 300 चा दर मिळाला आहे. शिवाय आगामी महिन्यातील सणासुदीमुळे या दरात आणखी वाढ होईल असा अंदाज आहे. तुरीच्या दरात वाढ झाली पण शेतकऱ्यांकडे माल नसताना. त्यामुळे याचा अधिकचा फायदा हा व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
महिन्यात दीड हजार रुपयांनी वाढली तूर
केवळ महिन्याभरात तब्बल 1 हजार रुपयांनी तुरीच्या दरात वाढ झाली आहे. राज्यातील हमीभाव केंद्र बंद झाली असतानादेखील तूर वधारली नव्हती. आयातीचे प्रमाण वाढल्याने देशांतर्गच्या बाजारपेठेवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता, मात्र गेल्या महिन्याभरापासून दरात मोठी वाढ झाली आहे. 5 हजार 800 रुपये प्रतिक्विंटलवरील तूर थेट 6 हजार 800 ते 7 हजार 500 रुपयांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाप्रमाणे तुरीचा साठा केला होता त्याच शेतकऱ्यांना वाढीव दराचा फायदा होत आहे.
म्यानमारमधून आयात, पेऱ्यात मात्र घट
तूर आयातीमध्ये सातत्य असले देशांतर्गत बाजारपेठेत तुरीच्या दरात वाढ होऊ लागली आहे. आता केवळ म्यानमारमधून तुरीची आयात होत आहे. लेमन तुरीची 7 हजार 200 रुपये प्रमाणे आयात होत असली देशातील दरही याबरोबरीवर पोहचले आहेत. तर दुसरीकडे मात्र, तुरीच्या क्षेत्रात घट झाली आहे. देशात 13.11 टक्क्यांनी क्षेत्र घटले आहे तर महाराष्ट्रात 11 टक्क्यांनी क्षेत्र घटले आहे. दराबरोबरच जून महिन्यात पावसाने उघडीप दिल्याचा परिणाम थेट पेरणीवर झाला होता. घटते क्षेत्र आणि वाढती मागणी यामुळे तूर उत्पादकांना अच्छे दिन येणार.
सणासुदीचाही दरावर परिणाम
केवळ आयात घटल्यामुळेच तुरीच्या दरात वाढ झाली असे नाहीतर देशभर सुरु होत असलेल्या सणासुदीचाही परिणाम झाला आहे. तुरीच्या मागणीत वाढ झाली आहे. शिवाय गतवर्षीही पावसामुळे उत्पादन घटले होते. त्यामुळे आयातीला परवानगी देण्यात आली होती. म्यानमारमधून आयात ही सुरुच असल्याने दर नियंत्रणात आहेत. तर आगामी महिन्यातही सण असल्याने मागणी अशीच राहिल असे व्यापारी अशोक आग्रवाल यांनी सांगितले आहे.