Summer Crop : सोयाबीन बहरलं पण अंतिम टप्प्यात गणित बिघडलं, मराठवाड्यातच नेमक असं काय घडलं?
पोषक वातावरणामुळे पीक बहरलेही. खरिपात झालेले नुकसान यंदा उन्हाळी सोयाबीनमधून निघेल असा शेतकऱ्यांना विश्वास असतानाच आता सोयाबीन धोक्यात आले आहे. कारण तापमानात वाढ झाली तर पाणी पातळी झपाट्याने खलावली आहे. वेळेत पाणी मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. आता थेट उत्पादनावरच परिणाम होणार आहे.
नांदेड : याला म्हणतात निसर्गाचा लहरीपणा…उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये (Unseasonable Rain) अवकाळी पावसामुळे रबी पिकांसह फळबागांचे नुकासन होत आहे. शेतामध्ये पाणी साचून राहत आहे तर दुसरीकडे मराठवाड्यात उन्हाच्या झळा वाढल्याने अंतिम टप्प्यात असलेल्या (Summer Soybean) उन्हाळी सोयाबीनने माना टाकल्या आहेत. (Marathwada) मराठवाड्यात पावसाची आवश्यकता असताना सूर्य आग ओकत आहे तर उर्वरीत भागात पावसामुळेच पिकांसह फळबागांचे नुकसान सुरु आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकरी गेल्या वर्षभरापासून करीत आहे. उत्पादनात वाढ होईल असा अवकाळी कधी बरसलाच नाही. शेतकऱ्यांसाठी तो नुकसानीचाच ठरत आहे. मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी जिल्ह्यांमध्ये यंदा उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा झाला आहे. पण वाढत्या उन्हामुळे आता उत्पादनात घट होण्याचा धोका आहे.
नेमका परिणाम काय ?
सोयाबीन हे पावसाळी पीक आहे. त्यामुळे या दरम्यानचे वातावरण आणि पावसामुळे याची वाढ कमी कालावधीत होते. यंदा पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला. शिवाय पोषक वातावरणामुळे पीक बहरलेही. खरिपात झालेले नुकसान यंदा उन्हाळी सोयाबीनमधून निघेल असा शेतकऱ्यांना विश्वास असतानाच आता सोयाबीन धोक्यात आले आहे. कारण तापमानात वाढ झाली तर पाणी पातळी झपाट्याने खलावली आहे. वेळेत पाणी मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. आता थेट उत्पादनावरच परिणाम होणार आहे.
प्रकल्पातील पाण्याचेही वेळाप्रत्रक कोलमडले
यंदा कधी नव्हे ते शेतीसाठी प्रकल्पातन असलेल्या राखीव पाण्याचा फायदा शेती पिकांना झाला होता. त्यामुळे पीके बहरली असून आता अंतिम टप्प्यात पाणी वितरणाचे वेळापत्रक कोलमडून पडले होते. त्याचाही फटका उन्हाळी सोयाबीनच्या उत्पादनावर झाला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनबाबत जो अंदाज बांधला होता त्यानुसार उत्पादन पदरी पडेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
उत्पादन घटणार
आतापर्यंत उन्हाळी हंगामातील सोयाबीनचे उत्पादन वाढणार असे चित्र होते. त्यामुळे खरिपात जे नुकसान झाले ते भरुन काढण्यासाठी या पिकाची मदत होईळ असे चित्र होते. मात्र, शेंगा पोसण्याच्या अवस्थेतच पाणी कमी पडू लागल्याने उत्पादनात घट होणार हे निश्चित आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळणार नाही.पण शेतकरी काहीही करुन सोयाबीन जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. उत्तर महाराष्ट्राप्रमाणे अवकाळी मराठवाड्यात बरसली तर सोयाबीनसाठी नवसंजीवनीच ठरणार आहे.