बाजार समितीमध्ये मापात-पाप, 300 ग्रॅममुळे लाखोंचे व्यवहारच बंद, काय आहे नेमके प्रकरण?

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडत्याच्या नावाखाली कमी वजन आकारले जाते. पण विनाकारण प्रतिक्विंटलमागे 300 ग्रम शेतीधान्याची कपात हे अकोट बाजार समितीचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खरेदीदाराकडून शेतीमालाचे वजन करताना 300 ग्रॅमची कपात ही ठरलेलीच आहे. नेमके यामागचे कारण काय ? हे देखील शेतकऱ्यांना सांगितले जात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असून (Farmer) शेतकऱ्यांनी याला थेट विरोध केला आहे.

बाजार समितीमध्ये मापात-पाप, 300 ग्रॅममुळे लाखोंचे व्यवहारच बंद, काय आहे नेमके प्रकरण?
शेतीमालाची खरेदी होताना नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने अकोट बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 1:21 PM

अकोला : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडत्याच्या नावाखाली कमी वजन आकारले जाते. पण विनाकारण प्रतिक्विंटलमागे 300 ग्रम (Agricultural Grains) शेतीधान्याची कपात हे (Akot) अकोट बाजार समितीचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खरेदीदाराकडून शेतीमालाचे वजन करताना 300 ग्रॅमची कपात ही ठरलेलीच आहे. नेमके यामागचे कारण काय ? हे देखील शेतकऱ्यांना सांगितले जात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असून (Farmer) शेतकऱ्यांनी याला थेट विरोध केला आहे. शिवाय प्रशासकही शेतकऱ्यांच्याच बाजूने उभे राहिले असून खरेदीदार आणि शेतकरी यांच्यात मतभेद वाढले असल्याने चक्क बाजार समितीमधील व्यवहार हे बंद ठेवावे लागले आहेत. जोपर्यंत यावर तोडगा निघच नाही तोपर्यंत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकाने घेतला आहे. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले नुकसान आणि आता बाजारपेठेमध्ये लूट यामुळे शेतकरी त्रस्त आहे.

जिल्हा उपनिबंधकांचाही हस्तक्षेप

प्रत्येक क्विटलमागे 300 ग्रॅम शेतीमालाची कपात हा विषय चांगलाच रंगलेला आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत असून जिल्हा उपनिबंधक यांनाही यामध्ये हस्तक्षेप करावा लागला होता. जर पोत्याचे वजन धरुन हे केले जात असेल तर ठिक आहे पण निव्वळ शेतीमालाच्या बाबतीत असे होत असेल तर ते चूकीचे असून जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर यांनी जिल्ह्यातील सर्वंच बाजार समित्यांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे. असे असतानाही शेतकऱ्यांची लूट सुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने आता प्रशासक उभे राहिले आहे. अकोट तालुका परिसरातून मोठ्या प्रमाणात शेती मालाची आवक होत असताना अशा प्रकारे मापात-पाप होत असेल तर ही एक फसवणूकच आहे.

नवीन वजनकाटे देऊनही व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार

शेती मालाच्या वजनात अनियमितता यावी म्हणून बाजार समित्यांनी खरेदीदार यांना अत्याधुनिक पध्दतीचे वजन काटे देण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार अकोट बाजार समितीनेही वजन काटे पुरवले आहेत. असे असताना व्यापारी हे क्विंटलमागे 300 ग्रॅम धान्य घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शिवाय यामागे उद्देश काय हे देखील स्पष्ट केले जात नाही.

मंगळवारपासून व्यवहार हे बंद

शेतकरी आणि खरेदीदार यांच्यातील मतभेद दिवसानुसार वाढत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले जात आहे. शिवाय शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची भांडणे यामुळे येथीव व्यवहारावर परिणाम होत आहे. त्यामुळे या कपातीबाबत योग्य ते धोरण ठरत नाही तोपर्यंत व्यवहार हे बंद राहणार आहेत.

संबंधित बातम्या :

ऊस लागवड करतानाच होते तोडणीचे नियोजन तरी गोदाकाठच्या ऊसाला फडातच तुरे..!

नाबार्डचा पतपुरवठा : ‘कृषी’ क्षेत्रासाठी 1 लाख 43 हजार कोटींची तरतूद, काय आहेत धोरणे?

Turmeric Crop : हळद पीक एक अन् समस्या अनेक, यंदा उत्पादन निम्म्यावरच, काय आहेत कारणे ?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.