Kisan Rail : शेतकऱ्यांना हवा ‘किसान रेल’चा आधार, उत्पादन वाढले शेतीमाल वाहतूकीसाठी साकडे

अगदी त्याप्रमाणेच लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होणारा शेतीमाल परराज्यातील बाजारपेठेत दाखल होत होता. चार पार्सल व्हॅनची सोय करण्यात आल्याने वाहतूक वाढून शेतकऱ्यांना याचा फायदा होत होता. आता जानेवारी महिन्यापासून फक्त एकच पार्सल व्हॅनमधून शेतीमालाची वाहतूक होत आहे. शेतीमाल परराज्यात पाठवण्यासाठी आता अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Kisan Rail : शेतकऱ्यांना हवा 'किसान रेल'चा आधार, उत्पादन वाढले शेतीमाल वाहतूकीसाठी साकडे
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 11:40 AM

लासलगाव : शेतीमालाची वाहतूक बाजारपेठेत आणि ते ही योग्य वेळेत उपलब्ध करुन देण्यामध्ये ( Kisan Rail) किसान रेलची महत्वाची भूमिका राहत आहे. या सुविधेमुळे पालघरचे चिक्कू थेट दिल्ली बाजारपेठेत दाखल होत आहेत. अगदी त्याप्रमाणेच लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होणारा (Transportation of Agricultural Produce) शेतीमाल परराज्यातील बाजारपेठेत दाखल होत होता. चार पार्सल व्हॅनची सोय करण्यात आल्याने वाहतूक वाढून शेतकऱ्यांना याचा फायदा होत होता. आता जानेवारी महिन्यापासून फक्त एकच पार्सल व्हॅनमधून शेतीमालाची वाहतूक होत आहे. (Agricultural Produce) शेतीमाल परराज्यात पाठवण्यासाठी आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पार्सल व्हॅन संख्या वाढवून मिळावी यासाठी लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना लेखी निवेदन देत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून पुन्हा पार्सल व्हॅन पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

किसान रेलमधील वाढीव क्षमतेने बदलले होते चित्र

आशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या हद्दीतील गावांमध्ये कांद्यासह द्राक्ष, भाजीपाला, फळे आणि भुसार शेती मालाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. परराज्यात शेतीमाल विक्री करता यावे तसेच या शेतीमालाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळावा यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने अनुदानित तत्वावर नासिक रोड रेल्वे स्थानकातून किसान रेल सुरु करण्यात आली. या किसान रेल ला लासलगाव रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला आहे. अगदी सुरुवातीला एकच पार्सल व्हॅन (व्हीपी) देण्यात आल्याने केवळ 24 टन इतकेच शेतीमाल पाठवता येत होते. मागणीत वाढ झाल्यानंतर चार पार्सल व्हॅन (व्हीपी) देण्यात आले यामुळे एप्रिल 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंत 10 लाख 8 हजार 679 क्विंटल शेतीमालाची निर्यात झाली या शेतीमालाच्या भाड्यातून लासलगाव रेल्वे पार्सल विभागाला 4 कोटी 54 लाख 1 हजार 805 रुपयांचे भरगोस उत्पन्न मिळाले होते.

उत्पादन वाढूनही उत्पन्न वाढेना, काय आहेत अडचणी?

लासलगाव परिसरात केवळ आता कांदा लागवडच नाही तर इतर पिकांचाही प्रयोग शेतकरी करीत आहे. त्यामुळे द्राक्ष, भाजीपाला, फळे, हंगामी पिकाचे उत्पादन वाढत आहे. शिवाय किसान रेल च्या माध्यमातून बाजारपेठेची सोय होत असल्याने शेतकऱ्यांनी नगदी पिकांवर भर दिला होता. मात्र, जानेवारी महिन्यापासूनच किसान रेलमधील शेतीमाल वाहतूकीची क्षमता ही कमी करण्यात आली आहे. त्यामुळे माल अधिक अन् पुरवठा कमी अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न तर सोडाच पण झालेला खर्चही निघत नाही. स्थानिक बाजारपेठेत योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

उत्पादित झालेल्या मालाला योग्य दर मिळावा: सभापती

शेती व्यवसयातून उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करीत आहे. लासलगाव भागात केवळ कांदाच नाही तर अन्य पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. जानेवारी पूर्वी किसान रेलची शेतीमाल वाहतूक करण्याची क्षमता ही अधिक होती. पण जानेवारीपासून केवळ एकच पार्सल व्हॅन (व्हीपी) मधून शेतीमाल पाठवण्याची परवानगी दिल्याने शेतीमाल परराज्यात पाठवण्यासाठी आता अडचणी निर्माण झाल्याने पार्सल व्हॅन (व्हीपी) संख्या वाढवून मिळावी यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना लेखी निवेदन दिले आहे. ही सेवा पुर्ववद करण्याची मागणी केली असल्याचे सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Turmeric Crop: वर्षभर प्रयत्नांची पराकष्टा, आता सर्वकाही दरावर अवलंबून

‘एफआरपी’ रकमेत अडकले 55 साखर कारखाने, कशामुळे होतेय वेगवेगळ्या रंगात कारखान्यांची यादी प्रसिध्द? वाचा सविस्तर

केजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.