Banana : केळीची आवक घटूनही दर स्थिरावलेलेच, केव्हा बदलणार चित्र?
केळी हे बारमाही घेता येणारे पीक असले तरी ज्या भागात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते त्या खानदेशात सध्या केळीची आवक घटलेली आहे. एखाद्या पिकाची आवक घटली तर दर वाढणार हे बाजाराचे सुत्र आहे. मात्र, केळीच्या बाबतीमध्ये असे होताना दिसत नाही. कारण खानदेशात सध्या केवळ 175 ट्रकने 16 टन सरासरी केळीची आवक होत आहे. असे असताना केळीला प्रति क्विंटल केवळ 400 ते 700 रुपये दर मिळत आहे.
जळगाव : केळी हे बारमाही घेता येणारे पीक असले तरी ज्या भागात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते त्या खानदेशात सध्या केळीची आवक घटलेली आहे. एखाद्या पिकाची आवक घटली तर दर वाढणार हे बाजाराचे सुत्र आहे. मात्र, केळीच्या बाबतीमध्ये असे होताना दिसत नाही. कारण खानदेशात सध्या केवळ 175 ट्रकने 16 टन सरासरी (Arrival of Bananas) केळीची आवक होत आहे. असे असताना (Banana Rate) केळीला प्रति क्विंटल केवळ 400 ते 700 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे वर्षभर वातावरणातील बदलाचा परिणाम उत्पादानावर झाला होता. परंतू, दरातून याची भरपाई होईल असा अंदाज (Farmer) शेतकऱ्यांना होता. मात्र, सध्या बाजारपेठेतली अवस्था ही चिंताजनक आहे. दर्जेदार केळीची काढणी सुरू आहे. पण दरात फारशी वाढ न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. जळगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा व धुळे जिल्ह्यातील शिरपूर भागातील कांदेबाग केळीची काढणी मागील आठवड्यातच पूर्ण झाली आहे.
काय आहेत कारणे ?
वातावरणातील बदलाचा परिणाम केळी पिकावर झालेला होता. शिवाय करपा रोगामुळे केळी बागांचे नुकसान झाले होते. पावसाचे पाणी केळी बागांमध्ये साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रतिकूल वातावरणामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी केळी बागा मोडल्याही होत्या. असे असतनाही आता जे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे त्यालाही योग्य दर नाही. सध्या वाढत्या थंडीमुळे केळीला मागणी कमी असल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात दर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार का व्यापाऱ्यांना होणार हे पहावे लागणार आहे.
केळीच्या दर्जानुसार मिळतोय दर
शेतीमालाच्या गुणवत्तेवरच त्याचा दर अवलंबून आहे. यंदा तर सातत्याने वातावरणातील बदलाचा परिणाम थेट उत्पादनावर तर झालेला आहेच शिवाय मालावर झालेला आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना दर्जानुसारच दर मिळाला आहे. आता चांगल्या केळीला 700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर खराब झालेल्या मालाला 250 रुपये पर्यंतचा दर मिळत आहे. वर्षभर उत्पादन घेण्यासाठी होत असलेला खर्च आणि आता प्रत्यक्ष व्यापाऱ्यांकडून होत असलेली खरेदी यामध्ये मोठी तफावत असल्याने झालेला खर्च कसा काढावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
तापमानात वाढ झाल्यावरच दरात होणार सुधारणा
केळी बारामाही बाजारपेठेत असते. मात्र, हिवाळ्यात वाढत्या थंडीमुळे केळीला मागणी ही कमी राहते. दरवर्षी अशीच स्थिती असली तरी यंदा उत्पादनात घट आणि झालेले नुकसान यामुळे ते अधिक तीव्रतेने जाणवत आहे. केळीची आवक फेब्रुवारीअखेर वाढेल. तापमान वाढीवनंतर केळी निर्यातीला देखील चालना येईल. परदेशात निर्यातीची तयारी काही कंपन्या करीत आहेत. यामुळे बाजारात केळीची मागणी काहीशी वाढेल. फेब्रुवारीअखेर दरवाढ होईल, अशी अपेक्षा उत्पादकांना आहे.
संबंधित बातम्या :
Onion: बाजार समितीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका, कांदा उत्पादक संघटनेच्या पत्रात दडलंय काय?
फडातले वास्तव आयुक्तांसमोर : एफआरपी, ऊसाच्या प्रश्न बाजूलाच तोडणी अन् वाहतूकीमधूनही शेतकऱ्यांची लूटच
Latur Market: सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात, दर घटूनही शेतकऱ्यांवर ‘ही’ नामुष्की..!