Paddy Crop : तीन वेळेस मुदत वाढवूनही धान खरेदीचे उद्दिष्ट अपूर्णच, रब्बीतील धान पीक थप्पीलाच

शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून नाफेडने सलग तीन वेळा मुदतवाढ देऊन धान खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मार्केटींग फेडरेशनची धोरणे आणि कारभार याचा फटका पुन्हा शेतकऱ्यांना बसलेला आहे. 90 खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी सुरु असताना देखील उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. 31 ऑगस्टपर्यंत केवळ 3 लाख 36 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती.

Paddy Crop : तीन वेळेस मुदत वाढवूनही धान खरेदीचे उद्दिष्ट अपूर्णच, रब्बीतील धान पीक थप्पीलाच
धान पीकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 4:07 PM

गोंदिया : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी विदर्भातील (Paddy Crop) रब्बीतील धान खरेदीचाच प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही. आतापर्यंत (Procurement centre) खरेदी केंद्रावर झालेली अनियमितता यामुळे धानाची खरेदी होऊ शकलेली नाही. नाफेडच्या माध्यमातून तीन वेळेस वाढीव मुदत देण्यात आली. असे असतानाही गोंदियामध्ये रब्बी हंगामातील धान हे थप्पीलाच आहे. त्यामुळे (District Marketing Federation) जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या गलथान कारभाराचा फटका मात्र, शेतकऱ्यांना बसत आहे. तर दुसरीकडे खुल्या बाजारात धानाला दर कमी असल्याने त्याची विक्री ही हमीभावात आणि खरेदी केंद्रावरच व्हावी ही धारणा शेतकऱ्यांची असते. मात्र, फेडरेशनची धोरणे आणि शेतकऱ्यांबाबत असलेली भूमिका याचा फटका बसत आहे. तीन वेळेस खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली असताना उद्दिष्टापेक्षा तब्बल 2 लाख 64 हजार क्विंटल धान हे शिल्लक आहे.

31 ऑगस्टपर्यंत होती मुदत

‘नाफेड’कडून सुरु करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर गोंदिया जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या धानाची विक्री झाली असे नाही. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत खरेदीची प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना जिल्हा मार्केटींग फेडरेशनला देण्यात आल्या होत्या. तिसऱ्या टप्प्यात 3 लाख 36 हजार क्विंटल धानाची खरेदी झाली पण 2 लाख 64 हजार क्विंटल धानाची खरेदी ही शिल्लक राहिली आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या कामाकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 31 ऑगस्टपर्यंत धान खरेदी करुन घ्यावयाची मुदत होती. आता वाढीव मुदत मिळणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

90 धान खरेदी केंद्र होते सुरु

शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून नाफेडने सलग तीन वेळा मुदतवाढ देऊन धान खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मार्केटींग फेडरेशनची धोरणे आणि कारभार याचा फटका पुन्हा शेतकऱ्यांना बसलेला आहे. 90 खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी सुरु असताना देखील उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. 31 ऑगस्टपर्यंत केवळ 3 लाख 36 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती.

आता मिळणार का वाढीव मुदत..!

रब्बी हंगामातील धानाची काढणी झाल्यापासून आतापर्यंत तीन वेळेस धान खरेदीसाठी वाढीव मुदत देण्यात आली. मध्यंतरी तर खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांचे धान अशीच चर्चा होती. त्यामुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. खरेदी केंद्रांना आतापर्यंत तीन वेळेस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता वाढ दिली जाणार की नाही याकडे गोंदियातील धान उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

म्हणून खरेदी केंद्रांनाच पसंती

विदर्भातील शेतकरी धानाची विक्री ही खुल्या बाजारात कऱण्यापेक्षा खरेदी केंद्रावरच अधिक करातात. कारण या केंद्रावर अधिकचा दर मिळतो. शिवाय पैशाची हमी असल्याने उशीर झाला तरी शेतकरी हे खरेदी केंद्रालाच पसंती देतात. मात्र, येथेही आता मनमानी कारभार सुरु झाला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.