AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Soybean Rate : दोन महिन्यांपासून सोयाबीनचे दर स्थिरावलेलेच, आता शेतकऱ्यांकडे एकच पर्याय..!

यंदा उत्पादनात घट झाल्याने शेतीमालाच्या मागणीत वाढ होणार हे शेतकऱ्यांनी गृहीतच धरले होते आणि झालेही तसेच. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी त्याची कसर ही वाढीव दरातून भरुन निघालेली आहे. मात्र, हेच सुत्र आता सोयाबीन हंगामाच्या अंतिम टप्प्यात होताना पाहवयास मिळत नाही. कारण गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रयोग करुन पाहिले पण सोयाबीनच्या दरात वाढ झालेली नाही.

Soybean Rate : दोन महिन्यांपासून सोयाबीनचे दर स्थिरावलेलेच, आता शेतकऱ्यांकडे एकच पर्याय..!
संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Feb 04, 2022 | 1:57 PM
Share

लातूर : यंदा उत्पादनात घट झाल्याने शेतीमालाच्या मागणीत वाढ होणार हे शेतकऱ्यांनी गृहीतच धरले होते आणि झालेही तसेच. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी त्याची कसर ही वाढीव दरातून भरुन निघालेली आहे. मात्र, हेच सुत्र आता (Soybean Market) सोयाबीन हंगामाच्या अंतिम (Kharif Season) टप्प्यात होताना पाहवयास मिळत नाही. कारण गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रयोग करुन पाहिले पण सोयाबीनच्या दरात वाढ झालेली नाही. 26 डिसेंबरपासून (Soybean Rate) सोयाबीनचे दर हे 6 हजार रुपये प्रतिक्विटलच्या दरम्यानच राहिलेले आहेत. या दरम्यान, शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली शिवाय आवकही वाढली मात्र, दराक काहीच फरक न झाल्याने आता शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीचाच निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण भविष्यात हेच दर टिकून राहतील का नाही याबाबत संभ्रम अवस्था आहे.

सोयाबीनचे दर स्थिरावलेले, तूरीच्या दरात मात्र वाढ

गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर स्थिरावलेले आहेत. 6 हजारापेक्षा अधिकचा दर सोयाबीनला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिला होता. मात्र, असे असतानाही दर वाढत नसल्याने सध्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 ते 20 पोत्यांची आवक होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून साठवणूक करुनही दर वाढले नाहीत त्यामुळे शेतकरी आता टप्प्याटप्याने विक्री करीत आहेत. शिवाय तुरीची आवकही बाजारपेठेत सुरु झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला 5 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल असलेली तूर आता थेट 6 हजार 300 पर्यंत येऊन ठेपलेली आहे. हमी भावाच्या बरोबरीने तुरीला दर मिळत आहे. मात्र, वाढीव दराच्या अपेक्षेने अजूनही सरासरी एवढी तूर बाजारात आली नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा?

खरिपातील सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. बाजारातील दरावरच विक्रीचे गणित अवलंबून होते. आता पर्यंत शेतकऱ्यांना यामध्ये यश मिळाले आहे. मात्र, आता अंतिम टप्प्यात परस्थिती ही बदललेली आहे. कारण यंदा उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. केवळ बियाणांकरिता म्हणून नव्हे तर खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी यंदा प्रथमच उन्हाळी हंगामात विक्रमी पेरा झाला आहे. उद्या भविष्यात या सोयाबीनची आवक सुरू झाली तर खरिपातील सोयाबीनचे दर अणखीन घसरतील त्यामुळे शेतकऱ्यांनी आता साठवणूकीतले सोयाबीन विकले तर अधिक चांगले राहणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Positive News: थंडी कमी होताच केळीच्या दरात वाढ, काय आहे खानदेशातले चित्र?

Seed Production : जे शासनाला जमलं नाही ते कृषी सहायकाने करुन दाखवंल अन् सोयाबीनच्या बाबतीत गाव स्वयंपूर्ण झालं

Cotton Rate: पांढर सोनं अजूनही घरातच, दरावरुन शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम कायम, काय आहे सल्ला?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.