याला लॉटरी सिस्टीम नाही, मागेल त्याला मिळणार; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

मागेल त्याला शेततळे आणि ड्रीप हा आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं. यासाठी कुठल्याही लॉटरी सिस्टीममधून जाण्याची गरज नाही.

याला लॉटरी सिस्टीम नाही, मागेल त्याला मिळणार; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 8:02 PM

मुंबई : मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्याला ड्रीप अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. कृषी विभागात जे काही ऑनलाईन अर्ज येतात, त्याची १०-१० हजाराप्रमाणे लॉटरी सिस्टीम काढली जाते. आता मागेल त्याला शेततळे मिळणार. कारण शासन मागणाऱ्याला शेततळे देणार आहे. जो शेतकरी ड्रीप मागेल त्याला सरकार ड्रीप देणार आहे. यात कुठलीही लॉटरी सिस्टीम राहणार नाही. तीन लाख शेतकऱ्यांनी ड्रीप आणि शेततळ्याची मागणी केली आहे. मागणाऱ्या प्रत्येकाला ड्रीप आणि शेततळे द्यावे, असा निर्णय राज्याचे कृषीमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी घेतला.

मागेल त्याला शेततळे आणि ड्रीप हा आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं. यासाठी कुठल्याही लॉटरी सिस्टीममधून जाण्याची गरज नाही.

कृषी विभाग तालुकानिहाय रिपोर्ट देणार

पर्जन्यमान लांबलं आहे. तीन-चार दिवसांत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी पाऊस कमी झाला. २२ ते ३० जुलैपर्यंत सोयाबीन पेरण्या करता येतील. तसेच दुबार पेरणीची गरज पडल्यास कृषी विभाग रिपोर्ट तालुकानिहाय रिपोर्ट देणार आहे.

शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्याचे आवाहन

एक रुपयांची पीक विमा योजनेचा फायदा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. शेतकरी कमी पडत आहे. याचा पूर्ण फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केला.

शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळावे

हमीभावापेक्षा जास्त रक्कम मिळाली तर चांगली गोष्ट आहे. टमाटरबाबत काही जणांनी आंदोलन सुरू केली. काही मोठ्या अभिनेत्यांनी टमाटर खाल्ले नाही तर शरीरातील प्रोटीन व्हॅल्यू कमी होणार नाही. शेतकऱ्याला दोन पैसे जास्त पैसे मिळाले, तर वेगळं राजकारण होऊ नये, अशी माझी इच्छा असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

आमदार असताना बियाणं वाटपासंदर्भात सर्वात अगोदर तत्कालीन मंत्र्यांना पत्र लिहीलं. मंत्र्यांनी बोगस बियाण्यांवर कारवाया सुरू केल्या. बोगस बीयाणं कुठल्याही शेतकऱ्यांपर्यंत पोहचू नये. बोगस बीयाणांचा कुणी धंदा करत असेल, तर त्याला उठवण्याची जबाबदारी कृषी विभागाने स्वीकारली असल्याचंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.