Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! धुळ्यात शेतातील 5 एकरातील संपूर्ण पीकच चोरुन नेलं

गेल्या वीस वर्षांपासून अज्ञात व्यक्तीकडून हिलाल पाटील यांच्या केळीच्या शेतीचे सातत्याने नुकसान करण्यात येत आहे. 

धक्कादायक! धुळ्यात शेतातील 5 एकरातील संपूर्ण पीकच चोरुन नेलं
5 एकरावरील संपूर्ण पीक चोरलं
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 3:12 PM

धुळे : शिरपूर तालुक्यातील तरडी या गावातील हिलाल गोपीचंद पाटील यांच्या केळीच्या शेतीचे अज्ञात (Dhule Banana Crop Stole By Unknown) व्यक्तीने नुकसान करुन पीकच चोरुन नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे (Dhule Banana Crop Stole By Unknown).

गेल्या वीस वर्षांपासून अज्ञात व्यक्तीकडून हिलाल पाटील यांच्या केळीच्या शेतीचे सातत्याने नुकसान करण्यात येत आहे.  गुरुवारी (28 जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास 5 एकर शेतामधील 5 हजार केळीचे पीक तोडून उध्वस्त करण्यात आले आहे. या नुकसानीला कंटाळून शेतकरी हिलाल पाटील यांनी 14 एकर मधील 9 एकर शेती विकली आहे. तरी सुद्धा अज्ञाताकडून शेतीचे नुकसान सुरुच आहे. शेतकरी हिलाल पाटील यांनी या त्रासाला कंटाळून पुंडलिक पाटील यांना शेती करण्यासाठी देऊनही नुकसान होत आहे.

Banana Crop, Farmer

5 एकरावरील संपूर्ण पीक चोरलं

याबाबत पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करुनही पोलीस प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. तसेच कृषी विभागाकडून गेल्या 20 वर्षात साधा पंचनामा सुद्धा होत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून शासनाकडे कैफियत मांडूनही आर्थिक मदत मिळत नसल्याने आत्महत्या करण्याचा इशारा हिलाल पाटील यांच्यासह पुंडलिक पाटील यांनी दिला आहे (Dhule Banana Crop Stole By Unknown).

तसेच, या केळीच्या पिकाची लागवड करण्यासाठी लाखो रुपये हिलाल पाटील यांनी कर्ज घेतले असून होणाऱ्या नुकसानामुळे कर्जाची परतफेड करणे अशक्य होत आहे. वारंवार होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी हिलाल पाटील  आणि त्यांची शेती करत असलेले पुंडलिक पाटील आर्थिक विवंचनेत सापडले असून शासनाकडे नुकसान भरपाईसह अज्ञाताला कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Dhule Banana Crop Stole By Unknown

संबंधित बातम्या :

आनंदाची बातमी; 12 हजार कोटींचा निधी मंजूर, प्रत्येक शेतकऱ्याला 4 हजार मिळणार

Success Story | मोती शेतीतून बंपर कमाई, 2 हेक्टरमध्ये 30 लाखांचा फायदा मिळवणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट

झुकिनी…. ‘फायद्याचा’ विदेशी भाजीपाला, नांदेडच्या शेतकऱ्याने बक्कळ कमावले!

आंबा फळबाग लागवडीतून लाखो रुपये कमावणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.