जून महिन्यात सुध्दा कडक उन्हं, पेरण्या लांबल्या, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. त्याचबरोबर काही शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहेत.

जून महिन्यात सुध्दा कडक उन्हं, पेरण्या लांबल्या, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
कोळपण केलेला कापूसImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 12:18 PM

धुळे : धुळे (dhule cotton cultivation) जिल्ह्यात तापमानाचा (temprature) पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. जून महिना लागल्यानंतर सुध्दा तापमान कमी होत नसल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे. अधिक उन्हं आणि उपलब्ध पाण्याचा विचार करून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धत सुरु केली आहे. शेतकऱ्यांनी निसर्गावर अवलंबून न राहता ठिबक अंथरणीला सुरुवात केली असून, त्यावर कापूस पेरणी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी सुमारे पंधरा दिवसाचे कापसाचे पीक आता शेतात दिसू लागले आहे. शेतकऱ्यांनी (farmer news in marathi) आता कोळपणी कामाला वेग दिला आहे. निसर्गतः पिकाला पाणी मिळाले तर रोपांची वाढ झपाट्याने तसेच चांगली होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पावसाने वेळेवर हजेरी लावावे अशी, अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

धुळे जिल्ह्यात कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळावा घेण्यात आला. शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात शिंदखेडा तालुका खरीप हंगामपूर्व आढावा बैठक व शेतकरी मेळावा संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्याचे आमदार जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. एकेकाळी शिंदखेडा तालुक्याला दुष्काळी कलंक लागला होता, पण आज शेतकरी नगर, नाशिक, धुळे आणि जळगांव जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न घेणारे पारितोषिक मिळवित आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात ही चांगले उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकाकडे आपला कल असू दयावा असे आवाहन देखील केले गेले. यावेळी नॅनो युरिया या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. त्याचबरोबर काही शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहेत. कारण पेरणीची वेळ एकदा निघून गेल्यानंतर पीक काढणीच्यावेळी अनियमित पावसाचा सामना करावा लागतो. यंदा महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं आहे. त्यामुळे शेतकरी जोमाने पेरणी करीत आहे. त्याचबरोबर कृषी विभागाचे अधिकारी बनावट बियाणांवरती लक्ष ठेऊन आहेत.

हे सुद्धा वाचा
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.