या जिल्ह्यात नवीन पीक कर्ज वाटप होणार, पण ही असेल अट

गेल्या वर्षी बँकेने 350 कोटी रुपयांचे पिकं कर्ज वाटप केलं होतं. या वर्षी नव्याने पाच हजार शेतकऱ्यांना अधिक पीकं कर्ज वाटपाचा विश्वास बँकेला आहे. बँकेत सद्यस्थिती साडेसहाशे कोटींच्या ठेवी आहेत.

या जिल्ह्यात नवीन पीक कर्ज वाटप होणार, पण ही असेल अट
Dhule NandurbarImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 2:20 PM

धुळे : धुळे आणि नंदुरबार (Dhule Nandurbar) जिल्हा बँकेच्यावतीने शेतकऱ्यांना येत्या पाच एप्रिल पासून नवीन पीक कर्ज (New crop loan) वाटप करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी बँकेच्या वतीने दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त कर्जाचे वाटप केले होते. आता जे शेतकरी एक एप्रिल पूर्वी घेतलेले पिकं कर्ज भरतील, या सर्वांना पाच एप्रिलपासून पीक कर्ज उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 50 टक्केच्या वर शेतकऱ्यांनी थकबाकी भरली आहे. येत्या काही दिवसात शेतकरी कर्ज भरतील आणि पुढील वर्षासाठी कर्ज घेण्यासाठी पात्र होतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी (Farmer) लवकरात लवकर मागील कर्ज भरावे असे देखील आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आली आहेत.

गेल्या वर्षी बँकेने 350 कोटी रुपयांचे पिकं कर्ज वाटप केलं होतं. या वर्षी नव्याने पाच हजार शेतकऱ्यांना अधिक पीकं कर्ज वाटपाचा विश्वास बँकेला आहे. बँकेत सद्यस्थिती साडेसहाशे कोटींच्या ठेवी आहेत. बँकेची स्थिती सुधारत असल्याने पीक कर्ज वाटपताही अधिक गती दिली जाणार आहे.

शासनाच्या वतीने हरभरा खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही

धुळे जिल्ह्यात अद्याप शासनाच्यावतीने हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांची नोंदणी सुरु आहे असे सांगून चालढकल केली जातं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला हरभरा कृषी उत्पन्न बाजार समितीत हमी भावापेक्षा हजार रुपये कमी किंमतीत विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बाजार समितीत हरभऱ्याला साडेचार हजार प्रति क्विंटल पेक्षा कमी दर मिळत आहे. शासनाचे हरभरा खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी दरात हरभरा विकण्याची वेळ आली आहे. शासनाच्या वतीने हमीभाव जाहीर झाला असून, 5 हजार 300 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने शासन हरभरा खरेदी करणार होते. मात्र सध्या फक्त ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. प्रत्यक्षात अद्यापही शासनाने खरेदी केंद्र सुरू न केल्याने कमी भावात शेतकऱ्यांना आपला हरभरा कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली आहे.

हे सुद्धा वाचा
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.