एक लाख रुपयाला बैलजोडी, व्यापाऱ्यांमुळे शेतकरी अडचणीत
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये जळगाव, नंदुरबार नाशिक, येथील येथील बैल विक्रीसाठी येत असतात.
मनीष मासोळे, धुळे : खरीप हंगामाला सुरुवात झाल्यानंतर शेतात (farmer news in marathi) काम करण्यासाठी चांगल्या बैलांची आवश्यकता असते. त्यासाठी शेतकरी आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगले बैल (bull market) घेण्यासाठी येत आहेत.पण असं असलं, तरी व्यापाऱ्यांकडून मात्र 90 हजार ते एक लाखापर्यंत बैलजोडी विकली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ज्यावेळी शेतीची कामं संपल्यानंतर धुळ्यातील शेतकरी बैल विकतात. त्यावेळी बैलांच्या किंमती पन्नास हजाराच्या दरम्यान असतात. परंतु ज्यावेळी शेतकऱ्यांना (agricultural news in marathi) बैल घ्यायचे असतात. त्यावेळी मात्र व्यापारी बैलांच्या किमती डब्बल करतात असं पाहायला मिळत आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये जळगाव, नंदुरबार नाशिक, येथील येथील बैल विक्रीसाठी येत असतात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैल खरेदी विक्रीतून लाखोंची उलाढाल होत असते. मात्र, शेतकऱ्यांकडून 30 ते 35 हजार रुपयापर्यंत बैल जोडी खरेदी करून ती जोडी मात्र शेतकरी घेण्यासाठी गेले असता, ती सुमारे 90 हजार ते एक लाखापर्यंत विक्री केली जाते अशा पद्धतीने लॉबिग व्यापारी करतात. त्यामुळे शेतकरी लुटला जात आहे. खरिपाचा हंगाम सुरू झाला असून चांगल्या बैलाची आवश्यकता भासते. मात्र बैलांच्या जोडीची किंमत वाढल्याने शेतकरी संकटात पडला आहे. तर दुसरीकडे बैलाची आवश्यकता असल्याने आता काय करावं ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
काही दिवसात मान्सून पाऊस सुरु होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील कामे जलदगतीने सुरु केली आहेत. काही शेतकऱ्यांनी पावसापुर्वी पेरणी सुध्दा केली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे.