वेळ निघून गेली अन् पीक पेरा नोंदणीचे महत्व कळाले, खरेदी केंद्रावर काय आहेत अडचणी?

कोणत्याही गोष्टीचे महत्व हे वेळ निघून गेल्यावरच कळते. मात्र, त्यानंतरचे प्रयत्न धडपड हे सर्व व्यर्थ आहे. असाच काहीसा प्रकरार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घडला आहे. खरीप हंगामात ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केली खरी पण रब्बी हंगामात या प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाले होते.

वेळ निघून गेली अन् पीक पेरा नोंदणीचे महत्व कळाले, खरेदी केंद्रावर काय आहेत अडचणी?
नाफेडच्यावतीने हरभरा खरेदी केंद्र राज्यभर उभारण्यात आली आहेत.
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 4:05 PM

औरंगाबाद : कोणत्याही गोष्टीचे महत्व हे वेळ निघून गेल्यावरच कळते. मात्र, त्यानंतरचे प्रयत्न धडपड हे सर्व व्यर्थ आहे. असाच काहीसा प्रकर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घडला आहे. खरीप हंगामात (E-Pik Pahani) ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी (Crop Register) पिकांची नोंद केली खरी पण (Rabi Season) रब्बी हंगामात या प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाले होते. रब्बी हंगामात मोजक्याच शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी केली होती. पण आता हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणीच्या दरम्यान शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. पीक पेऱ्याची नोंदणी असली तरच हरभऱ्याला आधारभूत किंमतीचा लाभ मिळणार आहे. अन्यथा खुल्या बाजारपेठेत विक्री करावी लागणार आहे. पण खुल्या बाजारपेठेतील आणि हमीभाव खरेदी केंद्रावरील दरात तब्बल 700 ते 800 रुपयांची तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.

…म्हणून खरेदी केंद्रावर नोंदणीच झाली नाही

एकतर रब्बी हंगामातील पिकांच्या ‘ई-पीक पाहणी’ कडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. शिवाय खरेदी केंद्रावर धान्य विक्री करताना पिकांची नोंद ही ऑनलाईन पध्दतीने असावीच असे काही माहिती नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. आता हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणी करायची असली तरी संबंधित शेतकऱ्यांना ऑनलाईन पिकपेरा, पासबुक, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. पण अनेक ठिकाणी ‘ई-पीक पाहणी’ अॅप हे सुरळीत चालले नसल्याचे शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. ऑनलाईन पीकपेरा अपडेट मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांची नोंदणीच झालेली नाही.

एका खरेदी केंद्रावर एकाच शेतकऱ्याची नोंद

हरभऱ्याला किमान 5 हजार 230 एवढा दर मिळावा म्हणून राज्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र, नोंदणीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष तर केले आहेच पण तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानेही नोंदणी होऊ शकलेली नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील एका खरेदी केंद्रावर तर एकाच शेतकऱ्याची नोंदणी झाल्याचे कृषी अधिकाऱ्याने सांगितले आहे. केवळ औरंगाबादच नाही तर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील खरेदी केंद्राची हीच अवस्था आहे. खरेदी केंद्रावर हरभरा नोंदणीसाठी अजूनही मुदत असली तरी त्याचा ऑनलाईन पीकपेरा असणे गरजेचे आहे. अन्यथा हरभऱ्याची विक्री शक्य नाही.

काय आहे शेतकऱ्यांच्या मागण्या ?

ऑनलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पीकपेरा नोंदणी केलेली नाही. त्यामुळे खरेदी केंद्रावरील नोंदणीलाही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ऑफलाईन पीकपेराही ग्राह्य धरावा अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी ही अडचण खरेदी केंद्राच्या माध्यमातून नाफेडच्याही निदर्शनास आणून दिलेली आहे. मात्र अजूनही तोडगा न निघाल्यामुळे नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

उत्सुकता शिघेला, दोन दिवस बाजार समित्या बंद नंतर सोयाबीन दराचे चित्र काय? तज्ञांचे शेतकऱ्यांना सल्ला

दुष्काळात तेरावा : युध्दजन्य परस्थितीमुळे खतांचा तुटवडा भासणार? इतर पर्यायाच्या शोधात केंद्र सरकार

Photo: हौसेला नाही मोल..! गायीच्या डोहाळे जेवणात गावाचा सहभाग, संस्कृतीचे जतन अन् वेगळेपणही

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.