शेतकरी म्हणतात, कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी उपाययोजना सुचवाव्यात, नाहीतर…
शेतीच्या पिकांवरती अनेकदा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी शेतकरी लागवड केल्यापासून पीक काढेपर्यंत पिकाची काळजी घेत असतात. अनेकदा असं पाहायला मिळतं की, शेतकरी रोगाचा प्रादुर्भाव पिकांवरती झाल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांना गाठतात.
नंदुरबार : शहादा (shahada) तालुक्यात शेतकऱ्यांनी (farmer news) मोठ्या प्रमाणात केळी (banana cultivation) आणि पपईची लागवड केली आहे. लागवड झाल्यानंतर दीड महिन्यात पपई आणि केळीच्या रोपांवर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासाठी मागळ्या औषधांची फवारणी केली, त्याचबरोबर विविध द्रव्य खते चार ते पाच वेळीस दिल्याने शेतकऱ्यांचा मोठा खर्च या पिकांवर झाला आहे. मात्र तीव्र तापमान व विविध आजारांमुळे या रोपांची मोठ्या प्रमाणावर मर होत असल्याचे चित्र शहादा तालुक्यात परिसरात दिसत आहे. यावर्षी पपईचे रोप १४ रुपयांपासून तर १६ रुपयांपर्यंत मिळत आहे. केळीचे रोप १५ ते १७ रुपयापर्यंत शेतकरी विकत घेऊन लागवड केली आहे. परंतु पिकाची लागवड त्याचसोबत संगोपनाचा मोठा खर्च असल्याने मर रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी मर रोगाचे कारण शोधून त्यावर उपाययोजना सुचवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज
शेतीच्या पिकांवरती अनेकदा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी शेतकरी लागवड केल्यापासून पीक काढेपर्यंत पिकाची काळजी घेत असतात. अनेकदा असं पाहायला मिळतं की, शेतकरी रोगाचा प्रादुर्भाव पिकांवरती झाल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांना गाठतात. त्यांना त्या पिकाची संपूर्ण माहिती देतात. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलेली औषधांची फवारणी पिकांवर करतात. त्यामुळे पीक पुन्हा जोमाने उभं राहतं. सध्या शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मागचे दोन हंगाम वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदील झाले होते.
जून महिना अर्धा संपला, तरी अद्याप देखील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. याचा परिणाम शेती पिकांच्या उत्पादनावर होत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक घटली आहे. यामुळे कोथंबीर, मेथी, शेपू, कांदापात, मिरची अशा भाजीपाल्यांचे दर वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोथिंबीर 70 ते 80 रुपये, मेथी 25 ते 30 रुपये, मिरची 50 ते 70 रुपये किलो असे दर सुरू आहे. या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसतं आहे.