Video: अमरावती बाजारसमितीत हमालाची गुंडगिरी, शेतकऱ्याला मारहाण, बाजारसमितीचं कारवाईचं आश्वासन

बाजार समितीमध्ये धान्याची खरेदी होत असताना कढता, वजन काट्यावरील मोजणी एवढेच काय पण वजन करताना पडलेले धान्य यावरुन सातत्याने शेतकरी आणि हमालांमध्ये वाद निर्माण होत असतात. वजन काट्यावर मापात पाप होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातो. त्यामुळे काही उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रीक वजन काट्यांचे वाटप करण्यात आले आहे. पण वजन काट्यावर धान्याची मोजणी सुरू असतांना खाली पडलेल्या धान्यावरून शेतकरी आणि हमालांमध्ये र्यापूर बाजार समितीमध्ये टोकाचा वाद झाला होता.

Video: अमरावती बाजारसमितीत हमालाची गुंडगिरी, शेतकऱ्याला मारहाण, बाजारसमितीचं कारवाईचं आश्वासन
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील बाजार समितीमध्ये हमालाकडून शेतकऱ्यास मारहाण झाली होती.
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 2:45 PM

अमरावती : बाजार समितीमध्ये धान्याची खरेदी होत असताना कढता, वजन काट्यावरील मोजणी एवढेच काय पण वजन करताना पडलेले (Grains) धान्य यावरुन सातत्याने (Farmer) शेतकरी आणि हमालांमध्ये वाद निर्माण होत असतात. वजन काट्यावर मापात पाप होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातो. त्यामुळे काही उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अत्याधुनिक (Electric Weight Fork) इलेक्ट्रीक वजन काट्यांचे वाटप करण्यात आले आहे. पण वजन काट्यावर धान्याची मोजणी सुरू असतांना खाली पडलेल्या धान्यावरून शेतकरी आणि हमालांमध्ये दर्यापूर बाजार समितीमध्ये टोकाचा वाद झाला होता. यामध्ये हमालांनी शेतकऱ्यास मारहाणही केली. अखेर बाजारसमिती प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण मिटले. मात्र, बाजार समितीच्या ठिकाणीही शेतकऱ्यांवर कसा अन्याय होतो हे यावरुन समोर आले आहे.

शेतकऱ्यांचा बाजार समितीमध्येच रास्ता रोको

मापात पाप किंवा वजन करीत असताना धान्याची नासाडी करायची हे हमालांचे ठरलेलेच आहे. शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे धान्याची जोपासणा करायची आणि बाजार समितीमध्ये मात्र, काटा मारुन हमाल एक प्रकारे शेतकऱ्यांची लूटच करतात. असाच प्रकार ज्ञानेश्वर पांडूरंग वडतकर यांच्याबाबत घडला. धान्य नासाडीबाबत त्यांनी हमालाला विचारले असता त्यांना थेट मारहाण करण्यात आली. हमालांची ही अरेरावी पाहून बाजार समितीच्या आवारातच शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता. यामुळे बाजार समितीमध्ये काही काळ तणावही निर्माण झाला होता.

नेमके काय झाले घटनास्थळी?

ज्ञानेश्वर पांडूरंग वडतकर हे शेतकरी शेतीमाल घेऊन बाजार समितीमध्ये दाखल झाले होते. मात्र, मालाचे वजन होत असताना अधिकतर माल हा जमिनीवरच पडत होता. असे असताना हमाल मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर शेतीमालाची नासाडी होत असल्याचे त्यांनी हमालाच्या निदर्शनास आणून दिले मात्र, येथे अशीच पध्दत असल्याचे सांगत शेतकऱ्याशीच हुज्जत घालण्यास सुरवात केली होती. अखेर शाब्दिक चकमकीचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. हमाालांनी मिळून शेतकऱ्यास मारहाण केली.

बाजार समिती प्रशासनाची मध्यस्ती

हमाल आणि शेतकरी यांच्यामधील वाद विकोपाला जात असल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या लक्षात आले. दरम्यान, झालेल्या मारहाणीवरुन शेतकऱ्यांनी थेट रास्ता रोकोच केला. यामुळे वाहतूककोंडी झाली शिवाय प्रकरण अधिकच चिघळू लागल्याने बाजार समिती प्रशासनाने हस्तक्षेप करुन संबंधित हमालावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण मिटले.

संबंधित बातम्या :

Drone Farming : शेत शिवारात पोहचलं ड्रोन, शेतकऱ्यांना प्रशिक्षण अन् काय आहे जिल्हा परिषदेचे धोरण?

Agricultural Pump : विद्युत पुरवठ्याचा कालावधी ठरला आता वीज तोडणी मोहीम बंद करण्यासाठी आंदोलन

Photo Gallery : नुकसानीची अवकाळी, काढणीला आलेली पीके भुईसपाट, रात्रीतूनच झालं होत्याचं नव्हतं..!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.