मुंबई : शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न वाढवण्याचा निर्धार (Central Government) केंद्र सरकारने केलेला आहे. पण केवळ शेती या मुख्य व्यवसयावर हे शक्य होणार नाही. शेतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुग्धव्यवसयाचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक मदत देण्याच्या राष्ट्रीय मोहिमेत (Benefits of Kisan Credit Card) किसान क्रेडीट कार्डचे वाटप केले जात आहे. यामाध्यमातून विविध (Schemes) योजनांचा लाभ घेता येणार आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आलेल्या या कार्ड वाटप मोहिमेत 17 डिसेंबरपर्यंत 50 हजार 454 किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले आहे. अजून दीड महिना ही अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरुच राहणार आहे. त्यामुळे जिल्हा ठिकाणच्या शिबिरामध्ये भाग घेऊन शेतकऱ्यांनी या कार्डचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
पशुपालक आणि दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना सवलतीच्या कर्जाच्या उपलब्धतेसाठी 1 जून 2020 ते 31 डिसेंबर 2020 या काळात विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. या दरम्यान, 14 लाख 25 हजार नवीन पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड (Kisac Credit Card) देण्यात आले. त्यामुळे त्यांना आता योजनांचा लाभ मिळण्यास सुरवात झाली आहे. केसीसी मोहिमेत यापूर्वी लाभ न झालेल्या दूध संघांशी संबंधित सर्व पात्र दुग्धउत्पादक शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे.
शेती व्यवसायाला जोड आहे ती दूग्ध व्यवसयाची. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होत नाही. याची कल्पना सरकारलाही आहे. शेती बरोबरच पशूपालनामध्येही विविध योजना राबवल्या तर अप्रत्यक्ष शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी हातभार लावल्यासारखे आहे. त्यामुळे आता सरकारने पूर्ण लक्ष पशुसंवर्धनाच्या योजनांवर केंद्रित केले आहे. यापूर्वी केवळ जो शेती व्यवसाय करीत होता त्यांनाच किसान क्रेडिट कार्ड हे दिले जात होते. पण आता तसे बंधन नाही. जनावरांचे संगोपन करणाऱ्यालाही याचा लाभ घेता येणार आहे.
राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत योगदान देण्याबरोबरच देशभरातील कोट्यावधी कुटुंबियांची उपजीविका ही दूध व्यवसयावरच आहे. ग्रामीण भागात तर शेतीपेक्षा अधिक महत्वाचा हा व्यवसाय झाला आहे. भारत हा दूध उत्पादक देशांमध्ये अग्रेसर आहे. यावर्षी 800 कोटीं रुपयांपेक्षा अधिकच्या दूध विक्रीची उलाढाल झालेली आहे. असे असले तरी भारतीय दुधाळ प्राण्यांची उत्पादकता जगातील बहुतेक दूध उत्पादक देशांपेक्षा कमी आहे. कमी उत्पादकतेमुळे दुधाळ जनावरांच्या संगोपनातून शेतकऱ्यांना मोबदला उत्पन्न मिळत नाही.
पशूपालकांना किसान क्रेडीट कार्ड मिळावे या करिता जिल्ह्याच्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. आठवड्यातून एकदा हे कार्ड वाटपाची मोहिम सरकारने हाती घेतलेली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. या योजनेअंतर्गत गाय, म्हशी, मेंढ्या आणि शेळ्या आणि कुक्कुटपालनासाठी केवळ 4% व्याजासह 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. प्रत्येक गायीमागे 40 हजार 700 रुपये आणि म्हशीमागे 60 हजार 249 रुपये कर्ज दिले जात आहे.