खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात, बोगस बियाणांवरती जिल्हा कृषी विभागाचं लक्ष, कारवाईसाठी पथक तयार

नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्गाचे अधिक हाल झाले आहेत. त्याचबरोबर अजून राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी इतकं उन्हं आहे की,शेतकऱ्यांच्या फळबागा करपून गेल्या आहेत.

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात, बोगस बियाणांवरती जिल्हा कृषी विभागाचं लक्ष, कारवाईसाठी पथक तयार
Agricultural departmetImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 2:21 PM

गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana) यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभाग (Agricultural departmet) अलर्ट मोडवर आहे. तब्बल 14 भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. एक जिल्हास्तरीय तर 13 तालुकास्तरीय पथक तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यात बोगस बियाण्यांची (bogus seeds) एन्ट्री होऊ नये म्हणून, बियाण्यांच्या बोगसगिरीवर सुद्धा कृषी विभागाची पथके करडी नजर ठेवून आहे. रब्बी हंगाम संपल्यानंतर खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून शेतकरी शेती मशागतीकडे वळत नाहीत. तोच मार्च तसेच एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला परिणामी, शेती मशागतीची कामेही प्रभावित झाली होती. मात्र मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि बियाणे खरेदी करताना गारपीट थांबल्याने गत 8-10 दिवसापासून शेती कामांना शेतकऱ्यांनी गती दिल्याचे दिसून येत आहे.

केळीच्या बागांना उन्हाचा फटका

नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्गाचे अधिक हाल झाले आहेत. त्याचबरोबर अजून राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी इतकं उन्हं आहे की,शेतकऱ्यांच्या फळबागा करपून गेल्या आहेत. सगळ्यात जास्त केळीच्या बागांना उन्हाचा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या पुर्वतयारीला अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. परंतु कडक उन्हं असल्यामुळे काम करीत असताना अनेक अडचणी येत आहेत. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला, त्यानंतर रब्बी हंगाम सुध्दा वाया गेला असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

हे सुद्धा वाचा

भाव पडताच कांद्याच्या शेतात फिरवल्या शेळ्या अन् मेंढ्या

भुसावळ तालुक्यात कांदा लागवडीचे क्षेत्र सुमारे ३ हजार हेक्टरपर्यंत आहे. पण, उन्हाळी कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा काढणी खर्चही निघत नाही. यामुळे हतबल झालेल्या गोजोरा व वांजोळा शिवारातील शेतकऱ्यांनी कांद्याच्या शेतात रोटोव्हेटर फिरवला. काही शेतकऱ्यांनी पिकात मेंढ्या चरायला सोडल्या. सध्या केवळ ३०० ते ५०० रुपये क्विंटलला दर मिळत आहेत. यामुळे मजुरीचा खर्चही निघत नाही. परिणामी वांजोळा येथील शेतकरी किशोर देवराम सावळे यांनी चार एकर, किरण भास्कर नेमाडे यांनी तीन एकर शेतात मेंढ्यांसह गुरे चराईसाठी सोडली.

बोगस बियाणे, खत विक्री केल्यास होणार कारवाई

बोगस बियाणे कुठेही आढळून आल्यास याची माहिती तुमच्या भागात असलेल्या कृषी विकास अधिकाऱ्याला द्यावी, त्यानंतर कृषी विकास अधिकारी त्या दुकानदारावर कारवाई करतात, राज्यात अनेक ठिकाणी कृषी साहित्य विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे. चुकीची माहिती देऊन धान्य विक्री करणाऱ्यांवर सुध्दा कारवाई झाली आहे. ही कारवाई जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.