AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Organic Farming : केंद्राच्या सूचना अन् वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांची अंमलबजावणी, केवळ सल्लाच नाही तर…

काळाच्या ओघात पुन्हा सेंद्रीय शेतीचे महत्व वाढत आहे. खर्च कमी आणि अधिकेच उत्पादन यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे. शिवाय केंद्र सरकारचाही भर हा सेंद्रीय शेतीवरच आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सेंद्रीय शेती वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेंद्रीय शेतीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी रिसोड तालुक्यातील नेतंसा, कंकरवाडी, अनगरवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन केले

Organic Farming : केंद्राच्या सूचना अन् वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांची अंमलबजावणी, केवळ सल्लाच नाही तर...
वाशिम जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी पीक पाहणी करुन शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती क्षेत्र वाढवण्याहबाबत मार्गदर्शन केले.
| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 10:13 AM
Share

वाशिम : काळाच्या ओघात पुन्हा (Organic Farming) सेंद्रीय शेतीचे महत्व वाढत आहे. खर्च कमी आणि अधिकेच उत्पादन यासाठी (Agricultural Department) कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे. शिवाय केंद्र सरकारचाही भर हा सेंद्रीय शेतीवरच आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सेंद्रीय शेती वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत (Agree University) कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेंद्रीय शेतीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी रिसोड तालुक्यातील नेतंसा, कंकरवाडी, अनगरवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन केले शिवाय रब्बी हंगामातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांसमवेत वनभोजनाचा आस्वादही घेतला. त्यामुळे आता कुठे स्थानिक पातळीवरही सूचनांचे पालन करुन सेंद्रीय शेती क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

सेंद्रीय पद्धतीने गव्हाचा पेरा

रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय पध्दतीने गव्हाचे उत्पादन घेतले आहे. यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही त्यांनी रासायनिक खतांचा वापर केला नाही. केवळ शेणखतावर या पिकाची जोपासना केली आहे. तर दुसरीकडे नेतंसा येथील शेतकरी दीपक बाजड व गजानन बाजड यांनी केलेल्या सेंद्रीय शेतीच्या प्रयोगाला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. केवळ अन्नधान्याचा दर्जाच सुधारतो असे नाही सेंद्रीय शेतीमध्ये खर्चही कमी होतो. शिवाय यासाठी जिल्हाभरात पोषक वातावरण असून शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पादनापेक्षा आहे ते उत्पादन चांगल्या दर्जाचे कसे घेता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय शेती वरदान

सेंद्रीय शेतीचा अवलंब कोणी करावा असे काही ठरवून दिलेले नाही. पण जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकरीच अधिक आहेत. शिवाय ही पध्दती अशाच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. कारण कमी क्षेत्राची योग्य जोपासना ही सहज शक्य आहे. कमी खर्चात अधिकचे उत्पादन अन् शेतीमालाला अधिकचा दर्जा यामधूनच शक्य असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

पीक पाहणी अन् शेतकऱ्यांसमवेत वनभोजन

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी शेतातील पिकांची पाहणी करून बचतगट उभारलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच अवजार बँक व जलसंधारण कामाची देखील पाहणी केली. महाज्योतीअंतर्गत पेरणी केलेल्या करडई पिकाची तसेच सेंद्रिय पद्धतीने लावलेल्या गहू पिकाची पाहणी केली.संत्रा व नवीन पद्धतीने लावलेल्या मोसंबी पिकाची देखील पाहणी करुन बदलत्या पीक पध्दतीबद्दल जाणून घेतले.जिल्हाधिकाऱ्यांनी गजानन बाजड यांच्या शेतात शेतकऱ्यांसोबत भाजी-भाकर जेवणाचा आस्वाद घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.

संबंधित बातम्या :

ज्वारीचे क्षेत्र तर घटले, आता भौगोलिक मानांकन टिकवून ठेवण्याचे ‘टार्गेट’..! काय आहेत मालदांडी ज्वारीची वेगळेपण?

Rice Export : बासमती तांदळाचा सुगंधही दरवळला अन् दरही वाढला, काय आहेत कारणे?

Banana Rate : अवकाळी, कडाक्याच्या थंडी नंतरही केळीचा गोडवा कायम, 15 दिवसांमध्ये दर दुप्पट होण्याचे काय कारण?

मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.