लातूर : अगोदरच अवकाळी पावसामुळे (orchards) फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय दरवर्षी काढणीनंतर 20 ते 30 टक्के फळांचे नुकसान हे होतेच. त्यामुळे काढणीनंतरचे ( Protection of fruits) व्यवस्थापन हे महत्वाचे असते. मात्र, याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे उत्पादनावर झालेला खर्च, परिश्रम आणि वेळही वाया जाते. काढणीनंतर का होते फळाचे नुकसान आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती प्रत्येक फळबागायत शेतकऱ्यासाठी महत्वाची ठरणार आहे.
काढणीनंतर चुकीच्या पध्दतीने फळे हाताळली जातात. एवढेच नाही तर योग्य पध्दतीने तोडणीही न केल्याने फळांचे नुकसान होते. पॅकिंगचा अभाव, चुकीची साठवणूक पध्दत आणि वितरण व्यवस्थेचे नियोजन नसल्यामुळे फळे ही बाधीत होतात. फळांच्या काढणीनंतर काही अंतर्गत जैविक बदल होतात त्यामुळे देखील पिकांचे नुकसान होते. ताज्या काढलेल्या फळांमध्ये अधिकतर प्रमाण हे पाण्याचेच असते. यापैकी 5 ते 10 टक्के पाणी बाष्पीभवनामुळे फळांमधून उडून गेल्याने काढणीनंतर काही वेळाने ही फळे सुकायला लागतात. यामुळे वजनात घट तर होतेच पण दरही कमी मिळतो. काढणीनंतरही फळांमध्ये पिकण्याची प्रक्रिया ही सुरुच असते. यामध्ये रासायनिक बदल घडून आल्यास फळांचे आयुष्य कमी होते आणि यामध्येच नुकसानही होते.
फळाच्या काढणीनंतर त्याची गुणवत्ता आणि आयुष्य ह्या महत्वाच्या बाबी आहेत. या दोन्ही गोष्टी ह्या त्याच्या परिपक्वतेवर अवलंबून आहेत. त्यामुळे काढणीसाठी फळे केव्हा परिपक्व होतात, त्याची लक्षणे कोणती हे समजून त्यानुसारच काढणी करणे हे महत्वाचे आहे. परिपक्व होऊन आंबा गळून जमिनीवर पडणे ही योग्य प्रक्रिया नाही. तर आंबा काडणीसाठी झेल्याचा वापर करणे गरजेचे आहे तर केळीचा घड काढण्यासाठी कोयता, द्राक्ष काढणीसाठी कात्री तर चक्कू काढणीसाठा अतुल झेल्यांचा वापर करणे आवश्यक आहे.
फळ काढणीनंतर सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणजे प्रतवारी. यामध्ये फळांच्या दर्जानुसार वर्गवारी करणे. यामध्ये किडलेली, नासलेली, दबलेली फळे ही चांगल्या फळापासून वेगळी करावी लागणार आहेत. जी फळे पिकण्यास सुरुवात झाली आहे ती प्रक्रिया उद्योगासाठी पाठविणे गरजेचे आहे. अन्यथा त्यााचा परिणाम इतर पिकांवर होणार आहे. फळे पॅकिंगसाठी लाकडी खोक्यांचा वापर केला जात होता. पण कोरुगेटेड पेट्यांचा वापर वाढत आहे. यामध्ये फळ भरताना पेटच्या चारही बाजूला हवा खेळती राहण्यासाठी छिद्रे आहेत का नाही याची तपासणी करावी लागणार आहे. शिवाय वाहतूकीच्या दरम्यान माल हा कुजणार नाही यासाठी गवताच्या काड्या ठेवणे गरजेचे आहे.