Buldhana : पावसाचा कहर त्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव, उगवलेल्या सोयाबीनची वाढ खुंटली

यंदा निसर्गाचा लहरीपणाचा परिणाम खरीप हंगामावर अगदी सुरवातीपासून पाहवयास मिळत आहे. यंदा जून महिन्यात वरुणराजाची अवकृपाच राहिले त्यामुळे पेरणीचे मुहूर्त सोडाच पण खरिपातील पेरण्या होतील की नाही अशी स्थिती होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अल्पशा पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली ती पण नुकसानीची ठरत आहे.

Buldhana : पावसाचा कहर त्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव, उगवलेल्या सोयाबीनची वाढ खुंटली
खरीप हंगामातील सोयाबीनवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 9:27 AM

बुलढाणा : (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांचा पेरा होताच पावसाने हाहाकार केला आहे. खरिपासाठी पाऊस हा पोषक असतो पण यंदा पिकांची उगवण होताच लागून राहिलेला पाऊस हा बाधित होत आहे. पावसाचे संकट कमी म्हणून की काय आता (Soybean Crop) सोयाबीनवर (Pest outbreak) लष्करी अळीचाही प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 8 दिवसांपासूनच सुर्यदर्शनच झाले नसल्याने लष्करी अळी वाढण्यासाठी हे पोषक वातावरण आहे. सध्याच्या दुहेरी संकटामुळे शेकतरी मेटाकूटीला आला आहे. किड नियंत्रणासाठीचे प्रयत्न केले जात आहेत पण सध्याच्या वातावरणामुळे किटकनाशकांचा देखील परिणाम या अळीवर होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट हे कायम आहे. 5 वर्षापूर्वीही जिल्ह्यात लष्करी अळीच्या प्रादुर्भावमुळे सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचीच पुन्नरावृती होताना पाहवयास मिळत आहे.

उशिराची पेर अन् पिकांना धोका

यंदा निसर्गाचा लहरीपणाचा परिणाम खरीप हंगामावर अगदी सुरवातीपासून पाहवयास मिळत आहे. यंदा जून महिन्यात वरुणराजाची अवकृपाच राहिले त्यामुळे पेरणीचे मुहूर्त सोडाच पण खरिपातील पेरण्या होतील की नाही अशी स्थिती होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अल्पशा पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली ती पण नुकसानीची ठरत आहे. पेरणी होताच सुरु झालेला पाऊस गेल्या 8 दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. शिवाय अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिके ही पिवळी पडत आहेत. त्यामुळे खरिपाबाबत सर्वकाही उशिराने झाले आहे. त्याचाच परिणाम आता पाहवयास मिळत आहे.

लष्करी अन् उंट अळीचा प्रादुर्भाव

सध्याच्या ढगाळ वातावरणात पिकांची वाढ तर खुंटली आहे पण बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, संग्रामपूर या तालुक्यातील सोयाबीन हे लष्करी आणि उंट अळीच्या संकटात सापडले आहे. शेतकऱ्यांनी किटकनाशकांची फवारणी केली आहे मात्र, सततच्या पावसामुळे त्याचाही परिणाम या अळीवर होत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. त्यामुळे सोयाबीनची उगवण होताच ते धोक्यात आले आहे. कीड-नियंत्रणासाठी प्रयत्न करुन देखील शेतकऱ्यांना प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आल्यानं ते मेटाकुटीला आलाय.

हे सुद्धा वाचा

काय आहे शेतकऱ्यांची मागणी ?

यंदा प्रतिकूल परस्थितीमध्ये खरिपातील पेरणी झाली असली तरी पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पिकांची उगवण होताच ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. आता पीक पेरणीबाबत मार्गदर्शन करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी पीक पाहणी करुन योग्य तो सल्ला द्यावा असा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे. आता योग्य उपाय झाले तरच पिकांची वाढ होऊन उत्पादन वाढणार आहे. अन्यथा नुकसान अटळ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.