Onion : कांद्यामुळे शेतकऱ्यांचा वांदा, दुहेरी संकटामुळे नुकासानीच्या झळा अधिक तीव्र

कांद्याचे केवळ दरच घटलेले नाही तर उत्पादनालाही फटका बसला आहे. जिल्हातल्या अकोट तालुक्यात पणज परीसरात सध्याच्या परिस्थितीत कांदा हे महत्त्वाचे पिक असुन आज रोजी हे पिक अंतिम टप्प्यात आहे. मात्र, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली असल्याने लावलेला खर्च सुद्धा निघनार नसल्याने पुढील मशागत कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. गत पावसाळ्यात अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बी हंगामातील गहू हरभरा या पीकांच्या तुलनेत कांदा पिकाची लागवड परीसरात अधिक प्रमाणात करण्यात आली होती.

Onion : कांद्यामुळे शेतकऱ्यांचा वांदा, दुहेरी संकटामुळे नुकासानीच्या झळा अधिक तीव्र
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 1:11 PM

अकोला : उन्हाळी हंगामातील काढणीला आलेला (Onion) कांदा काढवा की तसाच जमिनीत गाढून शेताची मशागत करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. दरवेळी दरातील लहरीपणाचा फटका तर शेतऱ्यांनाच बसतो हे कमी म्हणून की काय जिल्ह्यात (Onion Production) कांदा उत्पादनात मोठी घटही झाली आहे. कांदा काढणी करावा तर छाटणी आणि (Onion Market) बाजारपेठेपर्यंतची वाहतूक यामध्ये उत्पादनापेक्षा अधिकचा खर्च अशी स्थिती आहे तर दुसरीकडे उत्पादनातही घट झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त आहे. हंगामी पिकातून उत्पादन तर सोडाच पण पिकांवर झालेला खर्चही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कांद्याप्रमाणेच कलिंगड आणि खरबूजाची अवस्था आहे. त्यामुळे मुख्य पिकांचे नुकसान तर हंगामी पिकांना कवडीमोल दर यामध्ये शेती करावी कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कांदा उत्पादनात घट

कांद्याचे केवळ दरच घटलेले नाही तर उत्पादनालाही फटका बसला आहे. जिल्हातल्या अकोट तालुक्यात पणज परीसरात सध्याच्या परिस्थितीत कांदा हे महत्त्वाचे पिक असुन आज रोजी हे पिक अंतिम टप्प्यात आहे. मात्र, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली असल्याने लावलेला खर्च सुद्धा निघनार नसल्याने पुढील मशागत कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. गत पावसाळ्यात अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बी हंगामातील गहू हरभरा या पीकांच्या तुलनेत कांदा पिकाची लागवड परीसरात अधिक प्रमाणात करण्यात आली होती.फेब्रुवारी महिन्यात बदललेल्या वातावरणामुळे पाउस व धुकं मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे बहुतांश क्षेत्रातील लागवड करण्यात आलेल्या कांदा रोप जळुन पीकाला झळ बसली परीणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण आहे.

कवडीमोल दराने शेतकऱ्यांची निराशा

उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु झाल्यापासून सर्वकाही नुकासनीचे ठरत आहे. हंगामाच्या सरुवातील खऱिपातील लाल कांद्याची आवक सुरु असताना कांद्याला प्रति किलो 30 ते 35 रुपये असा दर मिळत होता. पण उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु झाली आणि दराला ग्रहण लागले. तब्बल अडीच महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण ही सुरुच आहे. सध्या मुख्य बाजारपेठांमध्ये कांद्याला 1 ते 2 रुपये किलो असा दर आहे.

हे सुद्धा वाचा

अशी ही शेतकऱ्यांची परवड

सध्याच्या परिस्थितीत परिसरात कांदा पीक अंतिम टप्प्यात आहे. समाधानकारक भाव नसल्याने कांदा साठवणूकीसाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांजवळ असून जर पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली तरी नुकसान अटळ आहे. उत्पादनाला भविष्यात समाधान कारक बाजारपेठ मिळेल अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे. कांदा पिकाला भरपूर पाणी द्यावे लागते खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात करावा लागतो यावर्षी उत्पादन खर्च अधिक असे असताना पुन्हा कवडीमोल दर कांद्याला मिळत आहे. यंदा मात्र कांद्याने शेतकऱ्यांचा चांगलेच वांदा केला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.