Banana : केळी उत्पादकांना दुहेरी फटका, बागांचे नुकसान अन् थंडीमुळे मागणीही घटली

वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर झालेला आहे. आता पर्यंत बागांचे होणारे नुकसान शेतकऱ्यांनी विविध फवारण्या करुन भरुन काढले पण वाढत्या थंडीमुळे केळीच्या मागणीतही घट झालेली आहे. केळी हे तीन्हीही हंगामात घेतले जाणारे एकमेव पीक आहे. मात्र, यंदा फळधारणा होण्यापासून सुरु असलेली संकटाची मालिका आता केळी तोडणी झाल्यानंतरही कायम आहे.

Banana : केळी उत्पादकांना दुहेरी फटका, बागांचे नुकसान अन् थंडीमुळे मागणीही घटली
केळी बागा अंतिम टप्प्यात असताना सुरळीत विद्युत पुरवठा होत नाही त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे.
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 9:41 AM

नांदेड : वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर झालेला आहे. आता पर्यंत बागांचे होणारे नुकसान शेतकऱ्यांनी विविध फवारण्या करुन भरुन काढले पण वाढत्या थंडीमुळे (Banana orchard) केळीच्या मागणीतही घट झालेली आहे. केळी हे तीन्हीही हंगामात घेतले जाणारे एकमेव पीक आहे. मात्र, यंदा फळधारणा होण्यापासून सुरु असलेली संकटाची मालिका आता केळी तोडणी झाल्यानंतरही कायम आहे. मध्यंतरीच्या (Untimely Rain) अवकाळी पावसाने आणि (Climate Change) ढगाळ वातावरणामुळे केळीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. यातून कुठे शेतकरी सावरत असतानाच पुन्हा वाढती थंडी या पिकासाठी हानीकारक ठरलेली आहे. दरवर्षी केळीला सरासरी 6 ते 7 रुपये किलो असा दर शेतकऱ्यांना मिळतो. यंदा मात्र, यामध्ये निम्यानेच घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी स्वत: बाजारपेठ जवळ करीत असताना वाढत्या थंडीमुळे ग्राहक केळी खरेदीकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.

केळी बागाची अशी घ्यावी काळजी

बदलत्या वातावरणाचा परिणाम आगामी काळात लागवड केल्या जाणाऱ्या केळीवरही होतो. त्यामुळे या थंडीच्या काळात फुल लागवड होऊच नये. कारण हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे किंवा कधीकधी गुच्छ आभासी खोडातून योग्य प्रकारे बाहेर येत नाही म्हणून गुच्छाची वाढ चांगली नाही. टिश्यू कल्चरपासून तयार केलेले केळीतील फूल 9 व्या महिन्यात लागतात तर साकरने लावलेल्या केळीतील घड 10 व्या किंवा 11 व्या महिन्यात येतो.

नांदेडचा पारा 10 अंशावर

यंदा कधी नव्हे तो मराठवाडा गारठला आहे. याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवरही झाला आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी थंडी तशी पोषक मानली जाते पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, काय होते याचा प्रत्यय यंदा शेतकऱ्यांना आला आहे. वाढत्या गारठ्यामुळे केळी बागावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे एकीकडे दर घटले असताना दुसरीकडे बागा जोपासण्याचे अव्हानही शेतकऱ्यांसमोर आहे. व्यापाऱ्यांनी कवडीमोल दराने मागणी केल्याने अनेक शेतकऱ्यांनी तोडणी करुन केळीची साठवणूक केली. शिवाय बाजारपेठही जवळ केली मात्र, थंडीमुळे ग्राहकही मागणी करीत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

अशी आहे दराची अवस्था

थंडीच्या लाटेमुळे गेल्या पंधरा दिवसापासून बाजारात केळीची मागणी घटलीय, त्यामुळे केळी व्यापारी आणि शेतकऱ्यांना त्यांचा फटका बसलाय. सध्या केळीचे व्यापारी हे बांधावर जाऊन हजार रुपये प्रति क्विंटल दराने केळीची खरेदी करत आहेत, काही दिवसांपूर्वी केळीची मागणी असताना हेच दर दीड हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेले होते.

संबंधित बातम्या :

Onion : कांदा लागवडीच्या योग्य पध्दती, कृषितज्ञांचा काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

आढावा रब्बीचा : पीक पध्दतीमध्ये बदल, हरभराच मुख्य पीक तर ज्वारीच्या पेऱ्यात घट

रंगीत फुलकोबीने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ अन् सर्वसामान्यांना फायदा, काय आहे कृषितज्ञांचे मत?

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.