sugar cane : परिश्रमाला जोड नियोजनाची, सरकारने नाही पण शेतकऱ्याने करुन दाखवले दुप्पट उत्पन्न

शेतीमालाला हमीभाव देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु ही घोषवाक्य ऐकायला बरी वाटतात. सरकारकडूनही याचा पुन्नउच्चार वारंवार झाला आहे. पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. या घोषणा हवेतच विरतात अन् शेतकऱ्यांच्या नशिबातील परिश्रम काही चुकत नाही. पण याच परिश्रमाला योग्य नियोजनाची जोड दिली तर काय क्रांती होऊ शकते हे जिल्ह्यातील सारंगखेडा येथील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

sugar cane : परिश्रमाला जोड नियोजनाची, सरकारने नाही पण शेतकऱ्याने करुन दाखवले दुप्पट उत्पन्न
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 1:15 PM

नंदूरबार : शेतीमालाला हमीभाव देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु ही घोषवाक्य ऐकायला बरी वाटतात. सरकारकडूनही याचा पुन्नउच्चार वारंवार झाला आहे. पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. या घोषणा हवेतच विरतात अन् (Farmer) शेतकऱ्यांच्या नशिबातील परिश्रम काही चुकत नाही. पण याच परिश्रमाला योग्य नियोजनाची जोड दिली तर काय क्रांती होऊ शकते हे जिल्ह्यातील सारंगखेडा येथील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. कितीही (Natural Calamities) नैसर्गिक संकटे आलीत तरी नियोजन योग्य असल्यास शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघते हे सिद्ध केलं आहे. (Organic manure) सेंद्रिय खताचा वापर करुन पंकज रावल यांनी ऊसाचे उत्पन्न एकरी 80 ते 85 टन घेतले आहे. शेतीपध्दतीमधील बदल आणि योग्य नियोजन काय असते हे इतर शेतकऱ्यांसाठी देखील प्रेरणादायी ठरणार आहे.

10 एकरामध्ये ऊसाची लागवड अन् योग्य नियोजन

पंकज रावल यांनी दहा एकरात सेंद्रिय पद्धतीने ऊसाची शेती करतात याचे उत्तम उदाहण समोर ठेवले आहे. ऊस लागवडीपूर्वी ते शेतात मोठ्या प्रमाणात शेणखत आणि परिसरात मिळत असलेला पालापाचोळा यापासून तयार केलेले गांडूळ खत शेतात विस्कटतात. जेवणात जसे आपण लोणचे, पापड चवीपुरते खातो तसेच रासायनिक खतांचा वापर गरजेपुरता करणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतामुळे जमिनीची पोत सुधारून उत्पादनात वाढ होते याचा त्यांना प्रत्यय आला आहे. सेंद्रिय खताबरोबरच आवश्यकतेनुसार सिंचनही महत्वाचे आहे.

ऊसाचा दुपटीने उतारा

उत्तर महाराष्ट्रात उसाचा सरासरी एकरी उतारा 40 ते 45 टन येत असतो. वेगवेगळे प्रयोग करुनही 50 टनापेक्षा अधिकेच उत्पादन होत नाही. मात्र, रावल यांनी एकरी 80 ते 85 टन उत्पन्न घेत आहेत. केवळ परिश्रमच नाही त्याला तर योग्य नियोजनाची जोड दिली तरच हे शक्य असल्याचे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळेच सेंद्रिय खताचा वापर करून आपल्या जमिनीचा पोत सुधारावा आणि उत्पादन डबल घ्यावे असे आवाहन त्यांनी इतर शेतकऱ्यांनाही केले आहे.

4 लाख खर्च अन् 8 लाखाचे उत्पादन

गेल्या अनेक दिवसांपासून रावल हे ऊसाचे उत्पादन घेत आहेत. आता त्यांनी लागवड क्षेत्रात आणि जोपासण्याच्या पध्दतीमध्येही बदल केला आहे. 10 एकर उसाच्या लागवडीपासून तोडणीपर्यंत त्यांना चार लाख रुपये खर्च आला आहे. तर दुसरीकडे उत्पादनाच्या विचार केला असता त्यांना 10 एकरात 8 लाख रुपयांचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे रासायनिक खतांवर जास्त खर्च न करता त्यांनी योग्य नियोजन केल्याने त्यांचा खर्चात बचत होऊन नफा वाढला आहे.

संबंधित बातम्या :

अवकाळी पाऊस बेतला जीवावर, वीज कोसळल्याने 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, रब्बीतील पिकेही आडवी

खरिपातील दोन पिकांच्या विम्याचे झाले काय ? शेतकऱ्यांना तर एक छदामही नाही, अधिकाऱ्यांचेही तोंडावर बोट

नुकसानीची अवकाळी : खरिपाची उरली-सुरली आशाही मावळली, रब्बी पिकांनाही वातावरणाचा धोका

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.