कृषी विभागाच्या एका निर्णयामुळे हळदीला चढणार ‘पिवळा’ रंग, नेमके धोरण काय ? वाचा सविस्तर

काळाच्या ओघात हळदीच्या क्षेत्रात पुन्हा वाढ होत आहे. मात्र, वाढत्या क्षेत्राबरोबरच उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्येच हळद लागवडीपासून प्रक्रिया आणि त्यानंतर निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया उद्योग धोरण निश्चित करण्याासाठी एक समिती नेमली आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया किंवा धोरण हा समितीच ठरविणार नाही तर यामध्ये सर्वसामान्य शेतकरी, कृषितज्ञ तसेच प्रगतशील शेतकरी यांना देखील सहभाग नोंदवता येणार आहे.

कृषी विभागाच्या एका निर्णयामुळे हळदीला चढणार 'पिवळा' रंग, नेमके धोरण काय ? वाचा सविस्तर
हळदीवर प्रक्रिया करुन उद्योग उभारणीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 3:04 PM

पुणे : काळाच्या ओघात (Turmeric Crop) हळदीच्या क्षेत्रात पुन्हा वाढ होत आहे. मात्र, वाढत्या क्षेत्राबरोबरच उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्येच हळद लागवडीपासून प्रक्रिया आणि त्यानंतर निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हळद संशोधन व (Processing Industry) प्रक्रिया उद्योग धोरण निश्चित करण्याासाठी एक समिती नेमली आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया किंवा धोरण हा समितीच ठरविणार नाही तर यामध्ये सर्वसामान्य (Farmer) शेतकरी, कृषितज्ञ तसेच प्रगतशील शेतकरी यांना देखील सहभाग नोंदवता येणार आहे. यामुळे सर्वाच्या विचारांची देवाण-घेवाण करुन हळद उत्पादन वाढीसाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत. आशा प्रकारे सूचना घेऊन धोरण ठरवण्याची ही पहिलीच वेळ असून अंतिम टप्प्यात नेमके काय हाती लागणार हे देखील पहावे लागणार आहे.

समिती स्थापनेचा नेमका उद्देश काय ?

राज्यात हळदीचे क्षेत्र हे वाढलेले आहे. पण त्या तुलनेत प्रक्रिया उद्योगाची माहिती नसल्याने उत्पन्नात वाढ झालेली नाही. हळद लागवडीपासूनची प्रक्रिया आणि विक्रीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संशोधन प्रक्रिया धोरण हे निश्चित केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोरील समस्यांवर उपाययोजना काय याचा मसुदा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये समिती आणि सर्वासामान्य शेतकऱ्यांच्या सूचनांचा विचार केला जाणार असून कृषी विभागाच्या माध्यमातून ते प्रसिध्द देखील केले जाणार आहे.

प्रक्रिया उद्योगातूनच अधिकचे उत्पन्न

हळद हे विविध कारणांसाठी वापरली जाते. यामध्ये औषधी गुण तर आहेतच पण सौंदर्य प्रसाधने करण्यासाठीही वापर केला जातो. मात्र, या दरम्यानचे प्रक्रिया उद्योगच शेतकऱ्यांना माहिती नसतात. आता त्याच अनुशंगाने सूचना मागवून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे लागवड ते प्रक्रिया उद्योग इथपर्यंतची माहिती होणार आहे.

अशा पाठवा सूचना

ग्राहक, शेतकरी, निर्यातदार उत्पादक तसेच उद्योजकांनाही कृषी विभागाकडे सूचना पाठवता येणार आहेत. phytocel@gmail.com या वेबसाईटवर किंवा कृषी उपसंचालक, फलोत्पादन-03 कृषी आयुक्तालयाकडे पाठवता येणार आहेत. यामुळे विचारांची देवाण-घेवाण होऊन हळद उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी उपयोगी ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Chickpea Crop: खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक, उत्पादन वाढले पण विकायचे कुठे?

Soybean Market : सोयाबीनची आवक वाढली, आठवड्याच्या पहिल्या दिवशी दराचे काय?

कृषी पंपावरुन रणकंदन : राज्य सरकारच्या सुल्तानी कारभारामुळेच ‘सुरज’ सारख्या शेतकऱ्याचा अस्त

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.