पीकविम्याच्या जाचक अटी, अतिवृष्टीने फळबागा उद्ध्वस्त तरीही मदत नाही, शेतकरी हैराण

अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेले असूनसुद्धा सरकारच्या तुघलकी निर्णयामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाहीये. (sangli farmers crop insurance)

पीकविम्याच्या जाचक अटी, अतिवृष्टीने फळबागा उद्ध्वस्त तरीही मदत नाही, शेतकरी हैराण
शेतकऱ्यांचे अशा प्रकारे नुकसान झाले आहे.
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 4:07 PM

सांगली :  दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमाच्या जाचक निकषांमुळे हक्काच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे. अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे याआधीच मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर आता अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेले असूनसुद्धा सरकारच्या तुघलकी निर्णयामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाहीये. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती याच कारणामुळे बिकट झाली आहे. पीकविम्यासंदर्भातल्या सरकारच्या आणि पीकविमा कंपन्यांच्या अटी शेतकऱ्यांना मारक ठरत आहेत. (due to complicated rules heavy rain affected Sangli farmers not able to get crop insurance help)

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेना

जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जत आणि आटपाडी या दोन तालुक्यांची ओळख आहे. या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात फळबाग शेती केली जाते. या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. त्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या डाळींब व द्राक्ष पिकांमुळे येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. डाळिंब आणि द्राक्ष हे दोन फळपीक या दुष्काळग्रस्त जनतेच्यासाठी वरदान ठरली आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा या शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. गेल्या दोन वर्षात अवकाळी पाऊसाने फळ बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. येथे मोठ्या प्रमाणात डाळिंब आणि द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. 2018-19 सालामध्ये शासनाकडून आणि पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली. मात्र आता या शेतकऱ्यांना 2020 मध्ये अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे हे अशक्य झाले आहे.

सरकारचे जाचक नियम

राज्य शासनाने सलग 5 दिवस प्रतिदिन 25 मिलिमीटर इतका पाऊस असेल तरच भरपाई मिळेल असा अध्यादेश काढला आहे. सरकारचे हेच निकष दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाचक ठरले आहेत. कारण दुष्काळी तालुक्यात आधीच पाऊस कमी पडतो. अशा परिस्थितीत कधी अवकाळी पाऊस पडला तर येथे फळपिकांचे मोठे नुकसान होते. यावेळीसुद्धा सांगलीतल काही तालुक्यांत अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, हे नुकसान नियमांमध्ये बसत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणे अवघड होऊन बसले आहे.

जत तालुक्यात शेतकरी अडचणीत

दुष्काळी जत तालुक्यात जवळपास 22 ते 25 हजार हेक्टर डाळिंबाचे आणि सुमारे आठ ते दहा हजार हेक्टर द्राक्ष पिकाचे क्षेत्र आहे. 2020 सालामध्ये जत तालुक्यातल्या सुमारे वीस हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवला होता. या शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी साडेसहा हजार रुपये इतकी विम्याची रक्कम भरली होती. त्यानंतर 2020 या वर्षात जत तालुक्याला अवकाळी पाऊसाचा फटका बसला. ज्यामध्ये डाळिंब पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. अवकाळी पावसामुळे डाळींब जागेवरच कुजले. त्यामुळे बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. द्राक्ष बागांची स्थितीसुद्धा अशीच आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ अजूनही मिळालेला नाही.

दरम्यान, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणा नुकसान झाले आहे. पीकविम्यासाठीचे काही निकष जाचक असून त्यामुळेच शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीये, असा आरोप येथील शेकऱ्यांनी केला आहे. तसेच पीकविम्याच्या नियमांमध्ये योग्य ते बदल करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणीससुद्धा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

इतर बातम्या :

आधीच कोरोना, लॉकडाऊनची भीती, टोमॅटोला 5 रुपयांचा भाव; उद्विग्न शेतकऱ्याने उचलले मोठे पाऊल

PM-Kisan: केंद्र सरकारद्वारे ‘या’ शेतकऱ्यांकडून 261 कोटींची वसुली, कारण काय?

प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे पुरस्कार जाहीर, ‘युवा शेतकरी’ व ‘कृषी संशोधक’ पुरस्कार सुरु होणार: दादाजी भुसे

(due to complicated rules heavy rain affected Sangli farmers not able to get crop insurance help)

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.