अतिवृष्टीने खरिपाचे नुकसान रब्बीला जीवदान, नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पाची काय आहे स्थिती?

खरीप हंगामादरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम अद्यापही जाणवत आहे. सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद आणि मूगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, याच पावसाचा फायदा आता रब्बी हंगामातील पिकांना होत आहे.जलसाठ्यांमध्ये वाढ तर झालेली आहेच पण प्रकल्पामध्येही अधिकचा साठा झाल्याने यंदा शेतीसाठी असणारे राखीव पाणी सिंचनासाठी देण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.

अतिवृष्टीने खरिपाचे नुकसान रब्बीला जीवदान, नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पाची काय आहे स्थिती?
राज्यात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 11:02 AM

नांदेड : खरीप हंगामादरम्यान झालेल्या (Heavy Rain) अतिवृष्टीचा परिणाम अद्यापही जाणवत आहे. सततच्या पावसामुळे (Kharif Season) खरिपातील सोयाबीन, उडीद आणि मूगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, याच पावसाचा फायदा आता रब्बी हंगामातील पिकांना होत आहे.जलसाठ्यांमध्ये वाढ तर झालेली आहेच पण प्रकल्पामध्येही अधिकचा साठा झाल्याने यंदा शेतीसाठी असणारे (Reserve Water) राखीव पाणी सिंचनासाठी देण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सरासरीच्या 66 टक्के जलसाठा असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके बहरात आहेत. पोषक वातावरणामुळे वाढ जोमात असून प्रकल्पातील पाणीही पिकांना मिळत आहे. त्यामुळे रब्बी पिकांसह जिल्ह्यातील केळी, हळद पिके बहरत आहेत.

पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी उजाडला की पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. पण यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे अद्याप तरी कोणत्याही जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झालेली नाही. नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रकल्पात सरासरीच्या 66 टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील विष्णुपुरी, मानार या प्रकल्पासह मध्यम आणि लघु प्रकल्पात जून अखेर पर्यंत पुरेल इतका जलसाठा आहे. त्यामुळे यंदा नांदेड जिल्ह्याला पाणीटंचाईचे संकट जाणवणार नाही असे चित्र आहे. असे असले तरी योग्य नियोजन करुनच पाण्याचा वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.

प्रकल्पामध्ये 493 घनमीटर पाणीसाठा उपलब्ध

अतिवृष्टीमुळे दरम्यान केवळ पिकांचेच नुकसान झाले नव्हते तर शेत जमिनही खरडून गेली होती. यामुळे खरीप हंगामात नुकसान झाले असले तरी सध्या पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न मिटलेला आहेच पण पिकांसाठीही पाणी उपलब्ध आहे. यंदा पावसाळ्या नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पात आजघडीला 493 दशलक्षघनमीटर पाणी उपलब्ध आहे. सध्याच्या उपलब्धतेनुसार जून अखेरपर्यंत पाणी पुरेल असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या प्रकल्पातील पाणी पिकांसाठी उपलब्ध

नांदेड जिल्ह्याला सिंचनासाठी पाणी पुरवठा होणाऱ्या शेजारच्या इसापूर, येलदरी, सिद्धेश्वर ह्या प्रकल्पात देखील समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांना यंदा पाणी कमी पडणार नाही. प्रकल्पांचा जो उद्देश होता तो खऱ्या अर्थाने यंदा साध्य होताना दिसत आहे. सध्या उन्हाळी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आहेत. आता पिकांना पाणी मिळाले तर उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा विषय मिटलेला आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महासंग्राम मेळावा

PM Kisan Yojna : योजनेचा लाभ मिळाला नाही मग, चिंता सोडा अन् बातमी वाचा

Red Chilly : मिरचीचे उत्पादन घटले दर वाढले, लाल मिरचीच्या आगारात काय आहे चित्र ?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.