टोमॅटोचा लाल चिखल, मिरची उपटून फेकली, पपईला बाजार भाव नसल्याने शेतकऱ्याकडून रोटरने बाग उद्ध्वस्त

पपईला बाजार भाव नसल्याने नाशिकच्या येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील शेतकऱ्याने ट्रॅक्‍टरच्या साह्याने रोटर मारून संपूर्ण पपई भाग उद्ध्वस्त केली.

टोमॅटोचा लाल चिखल, मिरची उपटून फेकली, पपईला बाजार भाव नसल्याने शेतकऱ्याकडून रोटरने बाग उद्ध्वस्त
शेतकऱ्याकडून पपईची बाग उद्धवस्त
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 10:57 AM

नाशिक : शेती पिकांना बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्याने मेटाकुटीस येत येवल्यात रस्त्यावर टोमॅटो फेकून देतात टोमॅटोचा लाल चिखल केला तर सिमला मिरची, साधी मिरची उपटून देत बांधावर फेकून देत मिरचीचा ठसका केल्याचं पहावयास मिळालं. त्या पाठोपाठ आता पपईला बाजार भाव नसल्याने येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील शेतकऱ्याने ट्रॅक्‍टरच्या साह्याने रोटर मारून संपूर्ण पपई भाग उद्ध्वस्त केली.

पपईला बाजार भाव नसल्याने शेतकऱ्याकडून रोटरने बाग उध्वस्त

येवला तालुक्यातील जळगाव नेउर येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी पारंपरिक पिके सोडून फळबाग लागवड करून मोठ्या उत्पन्नाच्या आशेवर पपई बागेवर केलेला सव्वा लाख रूपये खर्च केला. त्यानुसार २८ डिसेंबर २०२० ला दोन एकर क्षेत्रात तैवान- ७८६ पपई बागेची लागवड केली त्यात आंतरपीक म्हणून टरबूजाची लागवड केली होती. टरबूजाचे जेमतेम अल्प उत्पादन हाती आले होते. परंतु पपई बागेतून चांगले उत्पन्न हाती येईल या आशेवर पपई पिकावर खर्च केला.

त्यात पपई रोप अठराशे नग २७००० रूपये, शेणखत, लिक्विड खत, रासायनिक खते, मिक्स डोस, मल्चिंग पेपर, मशागत, मजुरी आदी एक लाख रूपये अशाप्रकारे एकुण अंदाजे सव्वा लाख रूपये खर्च झाला. त्याबदल्यात अवघे सतरा हजार रूपये उत्पन्न आले.

मातीमोल भावामुळे केलेला खर्च व त्यातून मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी दोन एकर बहरलेल्या पपई बागेवर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटरी मारून पूर्ण पपईबाग उद्ध्वस्त केली.

लातूरमधून दिलासादायक बातमी, डोंगराळ भागात काजूची बाग, अर्ध्या एकरात लाखोंचे उत्पन्न

लातुर जिल्हाची ओळख तशी दुष्काळी भाग म्हणुनच होते. पाण्याचा तसा स्त्रोत नाही की बागायती क्षेत्र अधिक नाही. असे असताना निलंगासारख्या तालुक्यात चक्क काजुची बाग बहरात आहे. वाटले ना आश्चर्य… काजुची बाग केवळ समुद्र किनारी आणि मुबलक प्रमाणात पाणी असलेल्या भागातच पाहवयास मिळते..पण निलंग्यातील खडका उमरगा येथील शेतकऱ्याने अर्ध्या एकरामध्ये ही किमया केली आहे. अथक परीश्रम आणि योग्य नियोजन यावरच बाग मोठ्या डोलाने बहरत असून या अर्ध्या एकरात दोन ते तीन लाखाचे उत्पन्न शेतकऱ्याच्या पदरी पडत आहे.

काजुच्या झाडांची वाढ होण्यासाठी दमट हवामान अनुकूल असले तरी विष्णू कदम यांनी मराठवाड्यातील डोंगराळ भागातही काजु उत्तमरित्या बहरतात हे दाखवून दिले आहे. केवळ काजूच नाही तर त्यांच्या शेतामध्ये आंबा फणस, पेरु, दालचिनी, कोकम अशी एक ना अनेक झाडे आहेत. सुरवातीच्या काळात त्यांनी अथक परीश्रम करीत तळहाताच्या फोडाप्रमाणे झाडांची जोपासना केली. मात्र, आठ वर्षााचा अनुभव असल्याने ते आता उत्तमरित्या सर्व झाडांची देखभाल करीत आहेत. गेल्या चार वर्षापासून या बागेतून उत्पन्न मिळण्यास सुरवात झाली आहे. कोणतीही प्रक्रिया न करता हे काजू बाजारात विकले जातात यातून कदम यांना दोन ते तीन लाख रुपये मिळतात. तेही 40 काजुच्या झाडांपासून…!

(Due to lack of market price for papaya, the orchard was destroyed by the farmer in maharashtra nashik)

हे ही वाचा :

होय..! लातुरच्या डोंगराळ भागात काजूची बाग, अर्ध्या एकरात लाखोंचे उत्पन्न

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.