Chickpea: दरवर्षीचीच बोंब, बारदाण्याअभावी रखडली हमीभाव केंद्रावरील खरेदी, शेतकरी Massage च्या प्रतिक्षेत

राज्यात हरभरा खरेदी केंद्र सुरु होऊन महिना उलटला आहे. आता कुठे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बाजारपेठेतील दर आणि खरेदी केंद्रावरील दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी केली मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी जो मेसेज पाठवला जातो ती प्रक्रियाच बंद आहे. खरेदी केंद्राकडे बारदाणाच शिल्लक नसल्याने हरभरा खरेदीची प्रक्रियाच गेल्या काही दिवसांपासून बंद आहे.

Chickpea: दरवर्षीचीच बोंब, बारदाण्याअभावी रखडली हमीभाव केंद्रावरील खरेदी, शेतकरी Massage च्या प्रतिक्षेत
हरभरा खरेदी केंद्रImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 2:31 PM

जालना : राज्यात (Chickpea Crop) हरभरा खरेदी केंद्र सुरु होऊन महिना उलटला आहे. आता कुठे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बाजारपेठेतील दर आणि खरेदी केंद्रावरील दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांनी (Shopping Center) खरेदी केंद्रावर नोंदणी केली मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी जो मेसेज पाठवला जातो ती प्रक्रियाच बंद आहे. खरेदी केंद्राकडे बारदाणाच शिल्लक नसल्याने हरभरा खरेदीची प्रक्रियाच गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. दरवर्षी (Farmer) शेतकऱ्यांचा माल सुरु झाली की ही समस्या समोर येतेच. मात्र, समस्यांपूर्वी उपाययोजना न करता आता किती दिवस खरेदी बंद राहणार या विवंचनेत शेतकरी आहे. नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न अशीच काय ती अवस्था हमीभाव केंद्राची झाली आहे. सुरवातीला शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आता खरेदी केंद्रावरच समस्या निर्माण होत आहेत.

महिनाभरात केवळ 24 हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी

जालना जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यांमध्ये नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. सुरवातीला नोंदणी आणि नंतर मालाचा दर्जा पाहून खरेदी ही प्रक्रिया आहे. येथील किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेतच हरभरा विक्रीला प्राधान्य दिले होते. मात्र, बाजारपेठेपेक्षा 600 रुपये अधिकचा दर असल्याने आता कुठे नोंदणीला प्रतिसाद मिळत होता. गेल्या महिन्याभरात 6 हजार 328 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे तर केवळ 24 हजार 181 क्विंटल हरभऱ्याची खरेदी ही केंद्रावर झाली आहे.

…म्हणून बारदाण्याची समस्या

राज्यात खरेदी केंद्र ही 1 मार्चपासून सुरु झाली आहेत. याच दरम्यान खरेदी केंद्रावर शेतीमाल साठवणूकीसाठी आवश्यक असलेला बारदाणा पोहचणे अपेक्षिक होते पण यासंबंधीचे टेंडर नाफेडने 21 मार्चला काढले आहे. त्यामुळे केवळ जालना जिल्ह्यातच नव्हे तर सबंध राज्यात ही समस्या उद्भवली आहे. शिवाय मराठवाड्यतील खरेदी केंद्रावर बारदाणा हा कोलकाता येथून पुरविला जातो. त्यामुळे आता कुठे निविदाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे अणखी काही दिवस तरी धिम्या गतीने हरभऱ्याची खरेदी होणार आहे.

अशी असते खरेदी केंद्रवरील प्रक्रिया

हमीभाव केंद्रावर शेतीमालाची विक्री करायची असल्यास प्रथम शेतकऱ्यांना त्या पिकाचा पीकपेरा घेऊन खरेदी केंद्रावर नोंदणी करावी लागते. यासाठी आधारकार्ड, बॅंक पासबुक, सातबारा, 8 अ अशी कागदपत्रे अर्जाला जोडून सादर करावी लागतात. यानंतर संबंधित खरेदी केंद्रावरुन शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून त्यांनी माल केव्हा घेऊन यायचे यासंबंधी संदेश दिला जातो. त्यानंतर शेतीमालातील आर्द्रता तपासून खरेदी केली जाते तर खरेदी नंतर 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा नियम आहे. पण प्रत्यक्षात याला आवधी लागल असल्यानेच शेतकरी खुल्या बाजारपेठेकडे वळत आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : आवक सोयाबीन अन् हरभऱ्याची चर्चा मात्र तुरीची, हंगामाच्या अंतिम टप्प्यात बदलले चित्र?

Agricultural Department : ठरलं त मग, खरिपात खताचा पुरवठा होणार पण कृषी विभागाच्या धोरणांचाही अवलंब करवाा लागणार..!

Photo Gallery : हौसेला नाही मोल, डोहाळं जेवण गायीचे अन् कौतुक अख्ख्या गावाला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.