या जिल्ह्यात 4 लाख 5 हजार हेक्टरवरील पेरणी रखडली, चिंताग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता

ज्या शेतकऱ्यांनी विहीरीचं पाणी असल्यामुळे कपाशीची लागवड केली होती. ते शेतकरी सध्या चांगलेचं अडचणीत आले आहेत. पुढच्या आठवड्यात पाऊस झाला नाहीतर, पीक करपून जाण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यात 4 लाख 5 हजार हेक्टरवरील पेरणी रखडली, चिंताग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता
washim farmerImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 9:58 AM

वाशिम : वाशिम (washim) जिल्ह्यात जूनचा तिसरा आठवडा संपत आला, तरी अद्याप महाराष्ट्रात (maharashtra news) मान्सून दाखल न झाल्याने खरिपाच्या 4 लाख 5 हजार हेक्टर वरील सोयाबीन सह इतर पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जर येत्या आठवड्यात पाऊस न पडल्यास पाण्या अभावी लागवड केलेली कपाशी जळून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी (agricultural news in marathi) चिंताग्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे

4 ते 5 दिवस पाऊस पडला नाही, तर…

वाशिम जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या 4 लाख 5 हजार हेक्टरवर करण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. यंदा जूनचा तिसरा आठवडा संपत आला, तरी पाऊस न पडल्याने खरिपाच्या सोयाबीन, तूर, मूग यासह विविध पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यातील 28 हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी सिंचनाची सोय असलेल्या 758 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. विहीरींनी तळ गाठल्याने या कपाशीला पाणी देणे शक्य नाही. “त्यामुळे कपाशीचे पीक करपत चालले आहे. त्यातच जर येत्या 4 ते 5 दिवस पाऊस पडला नाही, तर लागवड झालेली कपाशी ही जळून जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच उशिरा पाऊस पडल्यास कपाशीचा पेरा ही घटण्याची शक्यता आहे अशी माहिती कापूस उत्पादक शेतकरी सलामत अली, धनराज उंटवाल यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

उशिरा जर पडला तर…

वाशिम जिल्ह्यात यंदा खरिपाच्या 4 लाख 5 हजार हेक्टर पैकी 3 लाख 3 हजार हेक्टर वर सोयाबीन, 62 हजार हेक्टरवर तूर, 28 हजार हेक्टरवर कपाशी, 3 हजार हेक्टरवर मूग, 3 हजार हेक्टर वर उडीद पेऱ्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. वाशिम जिल्ह्यात अद्याप मान्सून दाखल झाला नाही. जोपर्यंत 75 ते 100 मिली मीटर पाऊस पडत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणतीही पेरणी करू नये. मान्सून उशिरा जर पडला तर सोयाबीनचे लवकर येणारे वाण पेरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याचबरोबर गणेश गिरी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.