Osmanabad : वाढत्या उन्हामुळे आंबा बागेचे नुकसान, बागेची अवस्था पाहून कृषी अधिकारीही चक्रावले
मराठवाड्यातही उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांनी केला होता. त्यांनी तब्बल 5 एकरावर आंबा बाग लावली. शिवाय आता तोडणी काही दिवसांवर आली असतानाच आंबे हे पूर्णत: भाजले आहेत. त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्याची विक्री आता शक्यच नाही.
उस्मानाबाद : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा (Mango Fruit) आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे. मध्यंतरी मोहर लगडला असताना अवकाळीमुळे सुरु झालेले नुकसान हे फळ लागेपर्यंत कायम राहिले. आता (Mango) आंबा तोडणी अवस्थेत वाढत्या उन्हाचा असा काय परिणाम झाला आहे की (Osmanabad) कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांची 5 एकरातील आंबा अक्षरश: करपला आहे. आता तोडणीला आला असतानाच ही अशी अवस्था झाल्याने कापसे यांना लाखोंचा फटका बसला आहे. कृषी अधिकारी यांनी पंचनामा केला असून आंबा बागेची ही अवस्था शॉर्टसर्किटमुळे झाली की वाढत्या उन्हामुळेच बाग कपरली याची पाहणी केली जात आहे. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाची सुरु झालेली अवकृपा आता अंतिम टप्प्यातही कायम असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.
माळरानावर बाग अन् रखरखते ऊन
मराठवाड्यातही उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांनी केला होता. त्यांनी तब्बल 5 एकरावर आंबा बाग लावली. शिवाय आता तोडणी काही दिवसांवर आली असतानाच आंबे हे पूर्णत: भाजले आहेत. त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्याची विक्री आता शक्यच नाही. कधी अवकाळी तर कधी उन्हाचा तडाखा हे शेतकऱ्यांच्या मुळावर कायम आहे. यामध्ये 10 लाखाचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी शेतकरी करीत आहेत.
अधिकारीही चक्रावून गेले
फळतोडणीच्या अवस्थेतील बागेची पाहणी करुन कृषी अधिकारीही चक्रावून गेले. अवघ्या काही दिवसांवर आंबा काढणी सुरु होणार तेवढ्यात हे न भरुन निघणारे त्यांचे नुकसान झालेन आहे. आंब्याची झाडे तर करपली असून आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षापासून कापसे हे बाग जोपासत होते. बागेचा काही भाग हा शॉर्चसर्किटमुळे जळाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वाढत्या उन्हामुळे उत्पादनावर परिणाम
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातही ऊन्हाचा पारा वाढला आहे. 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिके तर धोक्यात आलीच आहेत पण फळबागांनाही त्याचा धोका निर्माण झाला आहे. आंबा फळपिकाची गळती झाली की तो एका भागाकडून भाजलाच जातो. त्यामुळे हे न भरुन निघणारे नुकसान असून भरपाईची मागणी कापसे यांनी केली आहे.