Agriculture News : या कारणामुळे जळगावच्या बाजारपेठेत चांगल्या दर्जाची केळी मिळेना
केळीचं उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात सध्या चांगला भाव मिळत असून सुध्दा केळी उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळत आहे. कमी दर्जाची केळी ग्राहक खरेदी करीत नसल्याचं चित्र आहे.
जळगाव : राज्यभरात केळी (Banana Market) उत्पन्नात सर्वात अग्रेसर असलेल्या जळगाव (Jalgaon Farmer) जिल्ह्यात केळी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. 50 ते 60 रुपये प्रति डझन केळीला भाऊ देऊनही चांगल्या दर्जाची केळी ही बाजारपेठेमध्ये उपलब्ध नसल्याची खंत ग्राहक व्यक्त करीत आहे. सद्यस्थितीत कमी दर्जाच्या केळीला तीस ते चाळीस रुपये प्रती डझन विक्रमी भाव मिळत असून केळी उत्पादनात घट (Decline in banana production) झाल्याने मात्र केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सर्वाधिक केळी उत्पन्न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातच सध्या बाजारपेठेत ग्राहकांना केळी मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत असून 50 ते 60 रुपये प्रति डझन भाव देऊनही ग्राहकांना केळी मिळत नसल्याने केळी खरेदी करणे अवघड झाले आहे.
केळीचं उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात सध्या चांगला भाव मिळत असून सुध्दा केळी उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळत आहे. कमी दर्जाची केळी ग्राहक खरेदी करीत नसल्याचं चित्र आहे.
कामगारांनी कामगार अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले
धुळे कृषी बाजार समितीतील संतप्त हमाल कामगारांनी कामगार अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडत कार्यालयाला टाळ ठोकले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कामगारांनी कामगार अधिकाऱ्यांचा निषेध केला. त्याचबरोबर हमाल कामगारांची सुमारे 58 लाखांच्या लेव्हीसह मजुरी थकीत असून ती वसूल करण्यात यावी या मागणीसाठी कामगारांनी तब्बल 126 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान दहा दिवसात कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे कामगार अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र दोन आठवडे उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने अखेरीस संतप्त कामगारांनी माथाडी कामगार मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकले.