या कारणामुळे पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबिनची आवक वाढली, आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी…
जे पीकं वाचले आहे, त्या पिकांना दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पिकांची साठवणूक घरी केली होती. सध्या शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्यामुळे सोयाबिनची विक्री करावी लागतं आहे.
वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबीनची (Soybean crop) विक्रमी आवक होत आहे. शेतकरी खरीपाच्या तयारीसाठी सोयाबीन विकण्याची लगबग करीत असल्याने बाजार समितीमध्ये आवक वाढत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांत मिळून २० हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात (maharashtra agricultural news in marathi)पावसाच्या अनियमित पणामुळे रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामात नुकसान झालं आहे. जे पीकं वाचले आहे, त्या पिकांना दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पिकांची साठवणूक घरी केली होती. सध्या शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्यामुळे सोयाबिनची विक्री करावी लागतं आहे.
सोयाबीनचे दर गत हंगामात झपाट्याने खाली घसरत गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री थांबवली होती, तर दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यात काही बड्या शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे खरीपाच्या तयारी साठीही सोयाबीन राखून ठेवले होते. मात्र हंगाम संपत आला तरी सोयाबीनच्या दरात वाढ होण्याऐवजी घसरणच झाली. सद्यस्थितीत सोयाबीनला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दर सरासरी ४ हजार ८०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. शेतकऱ्यांना आता दरवाढीची अपेक्षा राहिलेली नाही. त्यात पावसाळा तोंडावर आला असून, खरीप पेरणीची तयारी शेतकरी करीत असल्याने त्यांनी सोयाबीन विक्रीवर भर देत असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. सोमवारी जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्या आणि उपबाजारांत मिळून २० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली आहे.
यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीचे कामं पूर्ण केलेली आहेत. मात्र मान्सून पाऊस लांबणीवर जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पावसापूर्वी मुबलक पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी शेत ओलित करीत पिकाची लागवड करीत आहे. या वर्षी हळद, सोयाबीन, तूर, मुंग उडीद या पिकाच्या पेरणी होत असून या पिकांना पावसाच्या पाण्याची वाट न बघतात सिंचन सोय करीत पिकाची लागवड करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.