अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला, शेतकरी दुहेरी संकटात
पावसाच्या पाण्याने खराब झाला असल्याने आता तो कांदा या शेतकऱ्यांनी (Farmer) रस्त्यावर फेकला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
गणेश सोनोने, अकोला : अकोला (Akola) जिल्हात 15 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) कांदा पीकाचं मोठ नुकसान झालं आहे. तर हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जवळा येथील कांदा उत्पादक शेतकरी सोनटक्के यांनी आपल्या शेतातील कांदा हा रस्त्यावर फेकला आहे. नितीन सोनटक्के यांनी दीड एकरात कांदा पेरला होता. त्यांना दीड एकरातून 300 क्यूँटल कांदा अपेक्षित होता. पण पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पीकाच मोठ झालं आहे. सोनटक्के यांना 50 क्विंटल कांदा झाला आहे. तोही पावसाच्या पाण्याने खराब झाला असल्याने आता तो कांदा या शेतकऱ्यांनी (Farmer) रस्त्यावर फेकला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अनोखे आंदोलन
अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी स्वतः पाहणी देखील केली. परंतु अद्याप कोणतीही नुकसाभरपाई मिळाली नाही. कांदा पिकाला हमीभाव आणि नाफेडमार्फत बाजार समितीत पारदर्शक खरेदी सुरू करावी यसाठी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी व्यंग चित्रांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे.
शेतकऱ्यांना नेमकं कधी नुकसान भरपाई मिळेल ?
नंदुरबार जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तळोदा तालुक्यात 761 शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. मात्र या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अजूनही मिळालेली नाही आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र दोन महिने उलटण्यात आले तरी देखील तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना नेमकं कधी नुकसान भरपाई मिळेल असा काहीसा प्रश्न आता शेतकरी राजा उपस्थित करू लागला आहे.