Crop Insurance : पीकविमा योजनेतील सर्वात मोठा अडथळा दूर, ‘ई-पीक पाहणी’बाबत मोठा निर्णय, प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी

पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे. आतापर्यंतच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सहभाग वाढेल असा अंदाज आहे. शिवाय पीक विमा योजनेचे स्वरुप बदलल्याने आता शासकीय विमा कंपनीचाच सहभाग राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक तर होणार नाहीच पण अधिकचा विमा मिळेल असा आशावाद आहे.

Crop Insurance : पीकविमा योजनेतील सर्वात मोठा अडथळा दूर, 'ई-पीक पाहणी'बाबत मोठा निर्णय, प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी
पीकविमा योजनेचे स्वरुप बदलले असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 5:11 PM

पुणे : पावसाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता (Crop Insurance) पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. मात्र, योजनेमध्ये सहभागी झाले तरी (E-Pik Pahani) ई-पीक पाहणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असे धोरण होते. (Farmer) मात्र, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्वचा निर्णय घेतला आहे. विमा हप्ता भरताना आता ई-पीक पाहणीची नोंद ही अट रद्द करण्यात आली आहे. गतवर्षी याच अटीमुळे अनेक शेतकरी हे मदतीपासून वंचित राहिले होते. शिवाय पिकाचे क्षेत्र आणि प्रत्यक्षात असलेला पेरा यामध्ये तफावत आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

13 लाख शेतकऱ्यांचा विमा योजनेत सहभाग

पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे. आतापर्यंतच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सहभाग वाढेल असा अंदाज आहे. शिवाय पीक विमा योजनेचे स्वरुप बदलल्याने आता शासकीय विमा कंपनीचाच सहभाग राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक तर होणार नाहीच पण अधिकचा विमा मिळेल असा आशावाद आहे. पेरण्या लाबल्याने आतापर्यंत केवळ 13 लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवला असला तरी ही संख्या वाढेल असा आशावाद कृषी विभागाला आहे.

कृषी विभागाचे काय आहे मत?

शासनाने विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी अनिवार्य ही अटच दूर केली आहे. विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे तर 1 ऑगस्टपासून पीक पेऱ्याची नोंदी घेण्याचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पीक पाहणीची नोंद सक्तीची असल्याबाबत संभ्रम कायम होता. मात्र, प्रत्यक्ष सहभाग घेतानाचे पीक आणि पाहणीच्या वेळीचे पीक यामध्ये तफावत असल्याचे मत कृषी विभागाने वर्तवले. त्यामुळे शेतकरी हे मदतीपासून वंचित राहत असल्याने ही अट रद्द करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

‘ई-पीक पाहणी’च्या दाखल्याची गरजच नाही

गतवर्षी पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया करीत असतानाच शेतकऱ्यांना आपण ई-पीक पाहणी केली असल्याचा अहवाल सादर करावा लागत होता. पण तशी गरज भासणार नाही. तर पीक पाहणीमध्ये केलेली पिकांची नोंद हीच अंतिम गृहीत धरली जाणार आहे. त्यामुळे आता विमा योजनेचा आणि ई-पीक पाहणीचा थेट संबंध असे राहिलेले नाही.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.