नवी दिल्ली : हिवाळ्याच्या हाडं गोठविणाऱ्या थंडीत अंडी-चिकनला (Eggs Chicken) मागणी असते. डिसेंबर-जानेवारीच्या महिन्यात अंड्यांना सोन्याचा भाव येतो. यंदाच्या वर्षी अंड्यांच्या भावात घसरण सुरू झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत वाढलेले अंड्याचे भाव जानेवारी महिन्यात उतरणीला लागले आहे. कोविड रुग्णांच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे (Corona Outbreak) सार्वजनिक वावरावर निर्बंध लादण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अंडी व चिकनच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम दिसून आला आहे. राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध गाजीपूर मुर्गामुंडीत चिकनच्या किंमतीत 25 टक्क्यांनी घट नोंदविली गेली आहे. अंड्याच्या किंमतीवर ‘ओमिक्रॉन’ मळभ दाटलं आहे.
अंड्यांच्या किंमतीवर परिणाम झाला नसून मागणीही रोडावली आहे. दिल्लीसह देशाच्या बाजारपेठेत मागणीत 50 टक्के घसरली आहे. दिवसाला 600 ते 800 अंड्याच्या विक्रीवरुन 300 अंड्यावर विक्री पोहोचली आहे.
दुकानांवरील 30 अंड्याच्या कॕरेटच्या किंमती 200 रुपयांवरुन 150 वर पोहोचल्या आहेत. ठोक बाजारातही अंड्याचे भाव घसरले आहेत. प्रति शेकडा 550 वरुन 500 रुपयांवर पोहोचले आहेत.
आंध्रप्रदेशच्या ईस्ट गोदावरी जिल्ह्यात भारतातील सर्वात स्वस्त अंडे मिळत आहे. 100 अंड्याच्या किंमतीत घसरण होऊन 450 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये 100 अंड्याच्या भावात वाढ होऊन किंमतीने 550 रुपयांचा टप्पा पार केला आहे.
देशात चिकनच्या मागणीत मोठी घट दिसून आली आहे. ‘ओमिक्रॉन’ सावटापूर्वी चिकनचे भाव दोनशे रुपये किलोवर पोहोचले होते. मात्र, लॉकडाउन निर्बंधामुळे मागणी घटल्याने चिकनचे भाव ‘डाउन’ झाले आहे. सध्या देशातील प्रमुख बाजारात दीडशे रुपये किलोने चिकनची विक्री केली जात आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरेंटला पुरवठा होणाऱ्या मालाची मागणीच निम्म्यावर येऊन ठेपली आहे. भावात मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवली गेली.
देशभरातील अंडी व चिकन व्यापाऱ्यांवर ओमिक्रॉनचं सावटं दाटलं आहे. सीमा बंदी झाल्यास मागणी साखळीच ठप्प होण्याची दाट आशंका व्यापाऱ्यांना भेडसावते आहे.
इतर बातम्या :