उन्हाळी हंगामात तेलबियांवर भर, दुर्लक्षित करडईचा कशामुळे वाढला पेरा? कारण साधे पण परिणाम मोठा

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हे पीक पध्दतीमध्ये बदल स्वीकारतात पण त्या तुलनेत मराठवाड्यातील शेतकरी हे पारंपरिक पिकांवरच भर देतात. मात्र, आता परस्थिती बदलत आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात हा बदल प्रकर्षाने जाणवत आहे. शेतकऱ्यांनी बदल तर केला पण थेट तेलबियांवरच भर दिला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये यंदा करडईच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तर तब्बल 10 हजार 700 हेक्टरावर करडईचा पेरा झाला आहे.

उन्हाळी हंगामात तेलबियांवर भर, दुर्लक्षित करडईचा कशामुळे वाढला पेरा? कारण साधे पण परिणाम मोठा
मराठावाड्यात यंदा उन्हाळी हंगामात पीक पध्दतीमध्ये बदल झाला असून करडईचे क्षेत्र वाढला आहे
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 5:07 AM

लातूर : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हे (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल स्वीकारतात पण त्या तुलनेत मराठवाड्यातील शेतकरी हे पारंपरिक पिकांवरच भर देतात. मात्र, आता परस्थिती बदलत आहे. यंदाच्या (Summer Season) उन्हाळी हंगामात हा बदल प्रकर्षाने जाणवत आहे. शेतकऱ्यांनी बदल तर केला पण थेट तेलबियांवरच भर दिला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये यंदा करडईच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तर तब्बल 10 हजार 700 हेक्टरावर (Mustard Crop) करडईचा पेरा झाला आहे. काही वर्षापूर्वी याच पिकाकडे शेतकरी दुर्लक्ष करीत होते. कारण करडईचे खोड, पाने, फुले हे सर्व काटेरी असल्याने त्याची काढणी आणि मळणी ही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक होती. शिवाय मजूरही या कामासाठी धजत नव्हते. पण आता ही सर्व प्रक्रिया यंत्राच्या माध्यमातून होत असल्याने पुन्हा करडईचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळेच यंदाच्या उन्हाळी हंगामात हा बदल दिसत आहे.

मुख्य पिकांना उत्तम पर्याय

शेतकऱ्यांच्या बदलत्या मानसिकतेला जोड मिळाली ती निसर्गाच्या लहरीपणाची. सततच्या पावसामुळे यंदा रब्बी हंगामातील पेरण्या ह्या लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे ज्वारीचा पेरा करुनही उत्पादनाबाबत साशंका होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन, करडई या तेलबियांवर भर दिला होता. त्यामुळे यंदा करडईचा पेरा विक्रमी झाला आहे. सध्या हे पीक जोमात असून खरीप हंगामात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी करडईची महत्वाची भूमिका राहणार आङे.

माळारावरही बहरत आहे पीक

करडई या पिकासाठी उत्तम प्रकारची शेतजमिन असावीच असे काही नाही. कोरडवाहू किंवा एक पाणी मिळेल अशा क्षेत्रावरही हे पीक घेता येते. यापूर्वी करडईचा पेरा केला जात होता पण करडईचे हे काटेरी असल्यामुळे काढणी आणि मळणी करणे जिकिरीचे होत असत म्हणून या पिकाकडे शेतकरी दुर्लक्ष करीत होते. यंदा वातावरणात बदल झाल्याने आणि पोषक वातावरणामुळे करडईचे क्षेत्र वाढले आहे. शिवाय या पिकाला कमी पाणी आणि मशागतीची तर आवश्यकता नाही. त्यामुळे कमी खर्चात अधिकचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी हा बदल केला आहे.

काढणी पध्दतीमध्ये काय झाला बदल?

यापूर्वी करडई पीक हे मजूरांकडून किंवा शेतकऱ्यास स्वत:हून काढावे लागत होते. करडईचे खोड, पाने, फुले हे सर्वच काटेरी असल्याने त्याची काढणी ही मुश्किल होत असत. शिवाय मध्यंतरी करडईचे दरही कमी झाले होते. आता काढणी कामासाठी यंत्राचा वापर वाढलेला आहे. जवळपास सर्वच शेतकरी यांत्रिकीकरणाचा वापर करीत आहेत. तर दुसरीकडे करडईला प्रति क्विंटल 5 हजार 600 चा दर असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या दृष्टीने पुन्हा करडईवर लक्ष केंद्रीत केले आहे.

संबंधित बातम्या :

तयारी खरिपाची : कृषी विभागाच्या नियोजनाला शेतकऱ्यांची साथ, बियाणाची टंचाई भासणार नाही खरिपात

कांदा तेजीतच… झुकेगा नहीं ये..!, केंद्र सरकारच्या ‘त्या’ निर्णयानंतर काय आहे चित्र?

द्राक्षातील दर निश्चितीचा उपक्रम आता पपईसाठीही, नियम मोडणार की टिकणार..!

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.