पपईच्या प्रक्रिया उद्योगातून मिळतो चार महिने रोजगार, या जिल्ह्यात पपईवरील प्रक्रिया उद्योग

पपईला उत्तर भारतात मोठी मागणी असते. मात्र आकाराने लहान असलेल्या पपईंना व्यापारी खरेदी करत नाही. ती पपई प्रक्रिया उद्योग करणारे व्यापारी खरेदी करत असतात.

पपईच्या प्रक्रिया उद्योगातून मिळतो चार महिने रोजगार, या जिल्ह्यात पपईवरील प्रक्रिया उद्योग
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 3:08 PM

नंदुरबार : देशातील सर्वात मोठा पपई हब म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात दहा हजार एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली जात असते. जिल्ह्यातील पपईला उत्तर भारतात मोठी मागणी असते. मात्र आकाराने लहान असलेल्या पपईंना व्यापारी खरेदी करत नाही. ती पपई प्रक्रिया उद्योग करणारे व्यापारी खरेदी करत असतात. त्यावर प्रक्रिया करून चेरी आणि इतर खाद्य पदार्थ तयार केले जात असतात. उद्योग चार महिने सुरू असतो.

पपईचे दूध औषध कंपन्यांना

उत्तर महाराष्ट्रामध्ये दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड केली जात असते. काही शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी नंदुरबार जिल्ह्यात पपई प्रक्रिया उद्योग सुरू केलेत. त्यामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कच्च्या पपईपासून प्रक्रिया करून अनेक पदार्थ तयार केले जातात. काही ठिकाणी पपईच दूध काढून त्याच्यावर प्रक्रिया करून औषधी कंपन्यांना दिल्या जात असते.

पपईपासून चेरी तयार करणे

प्रक्रिया उद्योगात पपई आल्यानंतर त्यातून पपईचे दूध काढले जाते. त्यानंतर तिची साल काढून मोठ्या कुंड्यात मिठाचे पाणी करून त्यात टाकले जाते. त्यातून प्रक्रिया करून काढलेली पपई चेरी आणि इतर पदार्थ बनवण्यासाठी कारखान्यांकडे जात असते.

संशोधन केंद्र नसल्याने अडचण

शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि चुकीच्या धोरणामुळे नंदुरबारसारख्या मोठ्या पपई हबमध्ये पपई प्रक्रिया उद्योगांची साखळी उभे राहू शकली नाही. त्याचसोबत पपईवरचा मोठा संशोधन केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

PAPAI 2 N

सालीपासून चाऱ्याचा प्रश्न सुटतो

पपई प्रक्रिया उद्योगातून निघणाऱ्या साल आणि इतर साहित्यातून गुरांना पौष्टिक असा चारा मिळतो. इतर भागातून पशुपालक शेतकरी चारा घेऊन जातात. उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटत असतो. असं शेतकरी कृष्णा पाटील यांनी सांगितलं.

पपई प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत असतो. त्यासोबत अनेकांना रोजगार मिळतो. शासनाने पपई प्रक्रिया उद्योगांना चालना देणारे धोरण नंदुरबार जिल्ह्यासाठी आखावे हीच अपेक्षा.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.