Sugarcane : कालावधी नंतरही ऊस फडातच, नेमके काय होतात परिणाम ?
ऊस लागवड झाल्यापासून 12 महिन्यांमध्ये त्याची वाढ पूर्ण होते. त्यामुळे 12 किंवा 13 व्या महिन्यात त्याची तोड होणे गरजेचे असते. अन्यथा वजनात तर घट होतेच पण उत्पादनही घटते. सध्या लागवड करुन 16 महिने झालेला ऊस शेतामध्ये ऊभा आहे. त्याला तुरे लागले असून ऊस वाळलेला आहे. हे कमी म्हणून की काय गेल्या आठ दिवसांपासून ऊनाचा कडाका वाढला आहे. शिवाय गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांनी ऊसाचे पाणीही बंद केले आहे.
पुणे : ऊसाची वेळीच तोड नाही झाल्यावर काय समस्यांना सामोरे जावे लागतेय हे आता (Marathwada) मराठावाड्यातील शेतकऱ्यांना चांगलेच माहित झाले आहे. गेल्या 4 महिन्यापासून या विभागात केवळ (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचीच चर्चा सुरु आहे. जो तो अतिरिक्त ऊसाची तोड कशी आणि कधी होईल या विचारातच आहे. वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. (Sugarcane Production) सरासरी 12 महिन्यानंतर ऊसाची तोड होणे अपेक्षित असते. तेव्हा कुठे वजन आणि उत्पादन हे सरासरीएवढे होते. पण आता 18 महिने उलटूनही ऊस हा फडातच उभा आहे. यामधून उत्पादनाची आशा तर शेतकऱ्यांनी सोडली आहेच पण हा ऊस किमान वावराबाहेर काढल्यास इतर पिकांचे उत्पादन घेता येणार आहे. अधिकचा काळ ऊस वावरात असल्याने तब्बल 30 ते 40 टक्के वजनात घट झाली आहे.
नेमके शेतकऱ्यांचे नुकसान काय ?
ऊस लागवड झाल्यापासून 12 महिन्यांमध्ये त्याची वाढ पूर्ण होते. त्यामुळे 12 किंवा 13 व्या महिन्यात त्याची तोड होणे गरजेचे असते. अन्यथा वजनात तर घट होतेच पण उत्पादनही घटते. सध्या लागवड करुन 16 महिने झालेला ऊस शेतामध्ये ऊभा आहे. त्याला तुरे लागले असून ऊस वाळलेला आहे. हे कमी म्हणून की काय गेल्या आठ दिवसांपासून ऊनाचा कडाका वाढला आहे. शिवाय गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांनी ऊसाचे पाणीही बंद केले आहे. सर्वकाही नुकसानीचे होत असून आता शेतकरी ऊसाची लागवड करणार का नाही अशी अवस्था झाली आहे.
नोंदणी नसलेल्या उसाची कथाच वेगळी
साखऱ कारखान्याकडे नोंदणी असलेल्या ऊसाच्या नुकसानीचा आकडा तरी काढता येतो. मात्र, ज्या उसाच्या नोंदीच नाहीत त्याचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. 18 महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी झालेल्या उसामध्ये 30 ते 40 टक्के घट येत आहे. दरवर्षी साखर कारखाने हे खरेदीसाठी मागावर असतात पण यंदा अतिरिक्त क्षेत्रामुळे गणितच बिघडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर अटळ आहेच पण वावरात उभा असलेला ऊस किमान पावसाला सुरवात होण्यापूर्वी वावरातून बाहेर काढावा हीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
वाढत्या क्षेत्राचा अंदाज न आल्यानेच समस्येत वाढ
शेतकरी, साखऱ कारखाने सोडा साखर आयुक्त कार्यालयाला देखील यंदा ऊसाच्या क्षेत्राबाबत अंदाज आला नव्हता. त्यामुळे हेक्टरी 85 टन याप्रमाणे उत्पादन आणि तोड याचे नियोजन प्रशासनाने केले होते. प्रत्यक्षात उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. नगर व नाशिक जिल्ह्यांमध्ये 1 लाख 47 हजार हेक्टर ऊस असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत 2 लाख 40 हजार हेक्टरावरील ऊसाची तोड झाली आहे. शिवाय अजून सुरुच आहे. हंगामाच्या सुरावतीपासूनच व्यवस्थापन आणि नियोजन बिघडल्याने ही अवस्था झाली आहे.