Chandrapur : धान खरेदी केंद्र सुरु होऊनही शेतकऱ्यांच्या समस्या कायम, पालकमंत्र्यांच्या पत्राने मिटणार का शेतकऱ्यांचा प्रश्न!

राज्यात धान खरेदीच्या केंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार खरेदीही सुरु झाली असून आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे. केंद्राने ठरवून दिलेला कोटा हा मर्यादित असून तो वाढविण्यासंदर्भात आता राज्य शासनाने अतिरिक्त धान खरेदीचा फेरप्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला आहे. त्यामुळे यावर सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद आहे.

Chandrapur : धान खरेदी केंद्र सुरु होऊनही शेतकऱ्यांच्या समस्या कायम, पालकमंत्र्यांच्या पत्राने मिटणार का शेतकऱ्यांचा प्रश्न!
धान पीक
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 10:12 AM

चंद्रपूर : राज्यात उशिरा का होईना (Paddy Production) धान खरेदी केंद्राला सुरवात झाली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत. धान पिकाची काढणी होऊन महिना उलटला तरी खरेदी केंद्र ही सुरु झाली नव्हती. (State Government) राज्य शासनाच्या रेट्याने हा विषय मार्गी लागला असला तरी धान खरेदीच्या कोट्याचा प्रश्न हा कायम आहे. त्याअनुशंगाने आता (MSP) खरेदी केंद्रावरील कोटा वाढवून देण्याच्या मागणी संदर्भात पालकमंत्री पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता 2 ते 3 दिवसांमध्येदेखील हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची आशा आहे.

अतिरिक्त धान खरेदीचा फेरप्रस्ताव

राज्यात धान खरेदीच्या केंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार खरेदीही सुरु झाली असून आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे. केंद्राने ठरवून दिलेला कोटा हा मर्यादित असून तो वाढविण्यासंदर्भात आता राज्य शासनाने अतिरिक्त धान खरेदीचा फेरप्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला आहे. त्यामुळे यावर सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद आहे. सध्या खरेदी केंद्र सुरु होऊन सुविधांपेक्षा अडचणी अधिक अशी स्थिती झाली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण धान विकणे अशक्य होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय झाला तर हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

11 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दीष्ट

राज्यातील धान उत्पादक क्षेत्राचा विचार करिता 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत धान खरेदीसाठी राज्यभरातून 1 लाख 33 हजार 443 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. राज्यातून धान खरेदीसाठी 11 लाख क्विंटलच्या धान खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील उत्पादकतेच्या हेतूने ही खरेदी केंद्र उभारली आहेत. चंद्रपूर मध्ये 4 हजार 143 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून धान खरेदीचे उद्दिष्ट 39 हजार 921 क्विंटल आहे. महाराष्ट्र राज्याची धान उत्पादकता 1. 86 एलएमटी असून केंद्र शासनाने केवळ 1. 50 एलएमटी धान खरेदीस मान्यता दिली आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांनो चिंता सोडा, तोडगा निघेल

धान खरेदी केंद्रावर ठरवून देण्यात आलेला कोटा हा धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे कोट्यामध्ये वाढ मिळावी या अनुशंगाने चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिरिक्त धान खरेदीचा फेरप्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला असून यावर लवकरच तोडगा काढला जाईल व धान खरेदी बाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.